JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पेणजवळच्या नदीत आढळलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तूची 7 तास तपासणी, समोर आलं हे सत्य

पेणजवळच्या नदीत आढळलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तूची 7 तास तपासणी, समोर आलं हे सत्य

रायगड आणि नवी मुंबई बॉम्ब शोध पथकाने ही वस्तू तपासली. त्यानंतर लक्षात आलं, की हे डमी बॉम्ब आहेत. यात वायर, पाईप आणि घड्याळ आहे. यात धोकादायक असं काहीच आढळलं नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, पेण 11 नोव्हेंबर : पेणजवळ असलेल्या भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या वाहून आल्याचे निदर्शनास आलं होतं. नदीपात्रात जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. यानंतर मुंबई-गोवा हायवेवरची दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता अखेर ही बॉम्ब सदृश वस्तू निकामी करण्यात आली आहे. पेणजवळच्या नदीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने खळबळ, मुंबई-गोवा हायवे बंद रायगड आणि नवी मुंबई बॉम्ब शोध पथकाने ही वस्तू तपासली. त्यानंतर लक्षात आलं, की हे डमी बॉम्ब आहेत. यात वायर, पाईप आणि घड्याळ आहे. यात धोकादायक असं काहीच आढळलं नाही. संध्याकाळी 7 वाजता सुरू झालेलं हे सर्च ऑपरेशन मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास संपलं. मात्र सकाळी पुन्हा एकदा या संपूर्ण परिसराची खबरदारी म्हणून पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. नदीमध्ये जिलेटन कांड्या सापडल्याचं समजताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांत विठ्ठल इनामदार,तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी ताततीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. शिवाय पेण तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या जिलेटन कांड्या नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी बॉम्ब शोधक पथकासही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. गुप्तचर यंत्रणांनी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला असतानाच पेणजवळच्या नदीत जिलेटनच्या कांड्या सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणखी अलर्ट झाल्या. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्याने मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली. मात्र, हे डमी बॉम्ब असल्याचं तपासात समोर आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या