'महावितरणचा कोण अभियंता आहे, पाच-पाच वर्ष काम करत नाही. वाटतंय काय त्याला, आज उद्या हे काम केलं पाहिजे.
राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 28 मे : राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये कायम संघर्ष पाहण्यास मिळाला आहे. राज्यमंत्री नसतानाही बच्चू कडू यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. पण, आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी एका महावितरणच्या (mahadiscom officers) अधिकाऱ्याला काम न झाल्यास थोबाडीत मारेन, अशी फोनवर धमकीच दिल्याचे समोर आले आहे. बच्चू कडूंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बच्चू कडू यांच्या हस्ते संग्रामपूरला रुग्णवाहिनीचे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील समस्यांचा पाढा बच्चू कडू यांच्याकडे वाचला. एक शेतकरी त्यांच्याकडे गेला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. मग काय, बच्चू कडू यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला फोन करून चांगलेच फैलावर घेतले.
‘महावितरणचा कोण अभियंता आहे, पाच-पाच वर्ष काम करत नाही. वाटतंय काय त्याला, आज उद्या हे काम केलं पाहिजे. नाहीतर तिथे येऊन थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षांमध्ये फक्त दीड लाख रुपये खर्च केला, जोडणी करण्यासाठी तुम्हाला वेळ नाही, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला झापून काढले. ( कोणते आहेत रणदीप हूडासारखे आणखी 11 underrated बॉलिवूड अभिनेते? ) नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असून अधिकारी काम करत नाही, असा आरोप ही राज्यमंत्री कडू यांनी केला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी धरले धारेवर धरले होते. केवळ रस्त्याची कामे याबाबत प्राधान्य असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना रमाई योजना पंतप्रधान योजनेचा विसर पडल्याने बच्चू कडू यांनी मुख्याधिकार्यांना धारेवर धरत चांगलीच कानउघडणी केली होती.