JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मुंबईच्या ठाकरेंची आजही दहशत, NCP च्या नादाला लागाल तर हात...', देवेंद्र भुयार यांचा थेट इशारा

'मुंबईच्या ठाकरेंची आजही दहशत, NCP च्या नादाला लागाल तर हात...', देवेंद्र भुयार यांचा थेट इशारा

’ तुमची ही दहशत नदीच्या काठापर्यंत आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या नादाला लागायचे नाही'

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 22 ऑक्टोबर : ‘मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. या नंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर तलवारीने हात छाटण्याशिवाय राहणार नाही’ असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला आहे. भुयार यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट शिवसेनेलाच इशारा दिला आहे.

‘मुंबईच्या ठाकरेंची दहशत कालही आहे, आज ही आहे आणि उद्या सुद्धा आहे. तुमची ही दहशत नदीच्या काठापर्यंत आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या नादाला लागायचे नाही. देवेंद्र भुयारच्या नादाला तर लागूच नका’ असा इशाराच भुयार यांनी दिला. (‘पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय’, शिवसेनेनं उडवली भाजपची खिल्ली) तसंच, ‘शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या नंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर तलवारीने हात छाटण्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही ध्यानात ठेवा, जुना देवेंद्र भुयार अंगात आणू नका, असा दमच भुयार यांनी विरोधकांना भरला. (शिंदे गटात वादाची ठिणगी! ‘सरकार येतं आणि कोसळतंही..भान ठेवा’; आमदाराने आपल्याच मंत्र्याला सुनावलं) 50 गद्दार आमदार हे गुजरातमार्गे गुवाहाटीला गेले आणि सरकार पाडलं. अलिबाब चाळीस चोरांचं हे सरकार आहे. या सरकारने आमचा कोट्यवधीचा निधी रोखला आहे. काही लोक जाणीपूर्वक बदनामी करत आहे. मला जर भाजपमध्ये जायचे असते तर तेव्हाच गेलो असतो आणि गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेऊन आलो असतो. पण लोकांनी माझ्या या वागण्यावर तोंडात शेण घातलं असतं, असं म्हणत भुयार यांनी शिंदे गटावरही टीका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या