JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्र की बिहार? पोलीस मुख्यालयाच्या गेटवरच पोलीस कर्मचाऱ्याचा खून, यवतमाळ हादरलं

महाराष्ट्र की बिहार? पोलीस मुख्यालयाच्या गेटवरच पोलीस कर्मचाऱ्याचा खून, यवतमाळ हादरलं

चक्क पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस कर्मचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली

जाहिरात

चक्क पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस कर्मचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 15 सप्टेंबर : महाराष्ट्र आता बिहारच्या वाटेवर चालला की काय अशी चिंता वाटायला लागली आहे**.** जुन्या वादाच्या कारणातून मारेकऱ्याने चक्क पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस कर्मचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस मुख्यालयाचा दारात ही घटना घडली आहे. निशांत खडसे, असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. निशांक खडसे हे कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आले होते. त्यावेळी मुख्यालयाच्या समोरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्याने अचानक निशांक खडसे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. खडसे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केलं. हल्ला केल्यानंतर मारेकरी पळून गेला. खडसे यांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. पण, अतिप्रमाणात रक्तस्त्रावर झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. (पतीच्या घर बांधण्याच्या हौसेनं घेतला विवाहितेचा जीव; बीडमधील धक्कादायक घटना) पोलीस मुख्यालयाच्या गेटजवळच ही घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जुन्या वादातून निशांत खडसे यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या