उल्हासनगर, 08 मे : उल्हासनगरमध्ये (ullhasnagar) भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. एका भरधाव दुचाकीने (bike accident) महिलेला जोरदार धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा सिंग असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. गोकुळ सिंग आणि राधा सिंग हे दोघेही पती पत्नी डोंबिवलीमध्ये राहणारे आहेत.
18 मार्च रोजी ते उल्हासनगर शहरात नातेवाईकांकडे आले होते. मात्र रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना कॅम्प नंबर 5 च्या लालसाई गार्डन तीन बंगल्याजवळ रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून एक भरधाव दुचाकी येत होती. दुचाकीस्वाराने या दोघांना पाहिले आणि गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीस्वार आधीच कोसळला आणि फरफटत जाऊन दोघांना धडकला. दुचाकी स्लिप झाल्यामुळे दोघांनाही जोराची धडक दिली. त्यावेळी समोरच एक कार उभी होती. दुचाकीची धडक बसल्यामुळे महिला कारच्या खाली फेकली गेली. तर राधा सिंग यांच्यासोबत असलेला गोकुळ सिंग हा दुचाकीवर पडला. ( मोक्याच्या सामन्याआधी Delhi Capitals ला मोठा धक्का! महत्वाचा खेळाडू रुग्णालयात ) या अपघातात राधा सिंग गंभीर जखमी झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार करण काली लबाना हा फरार झाला होता. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिललाईन पोलीसांनी त्याला अटक केली. ट्रक,ट्रॅक्टर,बुलेट आणि कारचा विचित्र अपघात, 2 जण ठार दरम्यान, बीडच्या केज शहरातील भवानी चौकात ट्रक, ट्रॅक्टर,बुलेट आणि कारच्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. उसाचे भरलेले ट्रॅक्टर, ट्रक आणि बुलेट या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. अपघात एवढा भीषण होता की, उसाने भरलेला ट्रकच्या खाली दुचाकीवरील दोघे जण अडकले होते त्यांना काढण्यासाठी क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. यात कुरेशी शहेबाज , शेख जुबेर आसेफ, या दोघाचा जागीच मृत्यू झाला.