JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खोपोलीमध्ये बसचा भीषण अपघात, 10 प्रवासी जखमी

खोपोलीमध्ये बसचा भीषण अपघात, 10 प्रवासी जखमी

खोपोली परिसरातील सायरस टाटा पॉवर जवळ एका मिनी बसचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 8 ते 10 जण जखमी झाले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : खोपोली परिसरातील सायरस टाटा पॉवर जवळ एका मिनी बसचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये  8 ते 10 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जखमींना उपचारासाठी  जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या बसमध्ये एकूण  18 प्रवाशी होते. बसचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बसमध्ये 18 प्रवासी घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  कार्ला येथून ही बस निघाली होती. खोपीलीजवळ आल्यानंतर या बसचा ब्रेक फेल झाला. बसचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडला आहे. या बसमध्ये एकूण  18 प्रवासी होते, त्यापैकी  8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यता आलं आहे. जखमींपैकी एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हेही वाचा :      राज्यपाल कोश्यारींचा वादाचा इतिहास, कधी महापुरुषांवर टीका तर कधी मराठी माणसाला डिवचलं स्थानिकांची मदतीसाठी धाव  दरम्यान घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये एक प्रवाशी गंभीर जखमी झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या