मुंबई, 20 एप्रिल : ‘पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर मी सुन्न झालो आहे. भीतीदायक आणि लाजिरवाणारा प्रकार आहे. संतांची, वीरांची भूमी असं म्हणणं यापुढे टाळूया. तर नराधमांची भूमी जास्त योग्य शब्द आहे.‘मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन याने उद्विग्न प्रतिक्रिया ट्वीट केली आहे. गुरुवारी पालघरमध्ये जो प्रकार घडला त्यावर सुमित राघवन चांगलाच संतापला आहे. गुरूवारी रात्री पालघरमधील एका गावातील ग्रामस्थांनी 3 साधूंची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे.
हे वाचा- बारामती पुन्हा एकदा हत्याकांड, जेलमधून सुटलेल्या मानसिक रुग्णाने केला खून
‘असे प्रकार करताना लाज वाटली पाहिजे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर लागलेला काळा डाग आहे.’ असा संताप सुमित राघवननं या घटनेनंतर व्यक्त केला आहे. त्याने हे ट्वीट करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पालघर पोलिसांना टॅग केलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. हे वाचा- …आणि अचानक रस्त्यावर पाडला पैशांचा पाऊस, CCTV फुटेजनंतर आलं सत्य समोर संपादन- क्रांती कानेटकर