पुणे, 09 ऑगस्ट: आज पुण्यात (Pune) मराठा समाजाची (Maratha Reservation) राज्यस्तरीय बैठक (Meeting) पार पडत आहे. मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचे असणारे 102 घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकार मार्फत आज लोकसभेत येणार आहे. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) राज्यातील समन्वयक, अभ्यासक यांच्यासोबत पुणे येथील महालक्ष्मी लान्स राजाराम महाराज ब्रीज येथे राज्यस्तरीय व्यापक बैठक घेत आहेत. प्रामुख्याने मराठा आरक्षण रद्द झाले त्यानंतर महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीराजे यांना महिन्यात इतर मागण्या सोडवू असे सांगितलं होतं. मात्र अद्याप मागण्या सोडवल्या नसून आज सरकारनं दिलेल्या आश्वासनाला आज दोन महिने होत आले. फक्त आश्वासनामुळे मराठा समाज नाराज असल्याने असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील आंदोलनाचा मार्ग आज ठरणार आहे. अनलॉक MH-12, जाणून घ्या आजच्या पुणे Unlock विषयी 102 घटना दुरुस्ती नंतर मराठा आरक्षण लढा नक्की कसा असावा याविषयी तज्ज्ञांशी चर्चा करून आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती मांडण्यात येणार आहे. पुण्यातील बैठकीत आजवरचा पूर्ण लेखाजोखा उपस्थितांच्या हातामध्ये देण्यात येणार आहे. मागण्या आणि सध्याची स्थिती युती सरकार आणि महाविकास आघाडी यांनी राबवलेली आणि दिलेली आश्वासनांचा पूर्ण व्हिडिओ तयार करून मांडली जाणार आहेत.