JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डिसेंबरपर्यंत कशी असावी राज्यातली परिस्थिती, सांगतायत वैद्यकीय तज्ज्ञ

डिसेंबरपर्यंत कशी असावी राज्यातली परिस्थिती, सांगतायत वैद्यकीय तज्ज्ञ

1 जूननंतर राज्यात लॉकडाऊनची कशी परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

जाहिरात

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे: महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्य सरकारनं जाहीर केलेला लॉकडाऊन (Lockdown) संपायला केवळ दोन दिवस शिल्लक आहे. 1 जून 2021 ला राज्य सरकार (State Government) नं जाहीर केलेला लॉकडाऊन संपेल. मात्र त्यानंतर राज्यात लॉकडाऊनची कशी परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारनं 15 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. शुक्रवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान राजकीय सभा, सामाजिक कार्यक्रम किंवा धार्मिळ मेळावा या गोष्टीमुळे पसरणाऱ्या कार्यक्रमास दोन महिन्यांपर्यंत परवानगी देऊ नये असं मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी राज्यात डिसेंबरपर्यंत गोष्टी धीम्या गतीनं नेण्याचा सल्ला दिला आहे. हेही वाचा-  परदेशी शिक्षणासाठी जाताय? विद्यार्थ्यांनो, पालिकेची ‘ही’ सुविधा खास तुमच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतर नव्या मार्गदर्शक नियमावली जाहीर करतील, असं टोपे यांनी म्हटलं. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत अशा जिल्ह्यांमध्ये शिथिलता दिसणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या घटली आहे. तसंच पॉझिटिव्हिटी रेटचा अभ्यास करुन त्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध उठवले जातील. दरम्यान अत्यावश्यक दुकानांव्यक्तिरिक्त कसे निर्बंध उठवले जातील याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. BMC कडून राज्य सरकारला विनंती पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येत असल्यानं बीएमसीनं काही पावसाळ्यासंबंधी आवश्यक दुकानं उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे. गृह दुरुस्ती एजन्सी, सुतार, छत्रीची दुकानं आणि पावसाळ्याच्या तयारीशी संबंधित दुकानं सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं विचार करावा अशी विनंती केल्याचं, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं. लोकल ट्रेनचे दरवाजे बंदच मुंबईत लोकल ट्रेन सामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्याची अद्याप कोणतीच योजना आखली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 10 दिवसांत शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 5% पेक्षा कमी झाला आहे. मात्र तरी देखील लोकल ट्रेन अद्याप सुरु करण्याचा विचार नाही आहे, असं काकाणी यांनी म्हटलं. शुक्रवारी हा दर 3 टक्के होता. वैद्यकीय तज्ज्ञांचं मत काय? दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांच आकडा कमी होत असल्यानं निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली जात आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी याविरोधात भूमिका घेत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं राज्य सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा सतत वाढणारा आकडा लक्षात घेता राज्याला डिसेंबर महिन्यापर्यंत हा वेग कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यानं डिसेंबरपर्यंत हळूहळू निर्बंध उठवणं आवश्यक आहे. जर घाईघाईनं निर्बंध उठवले तर पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळेल, असं साळुंखे यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्याही अधिक आहे तसंच लसीकरणही धीम्या गतीनं सुरु आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णतः उठवणं चुकीचं ठरेल, असं साळुंखे म्हणालेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या