Mumbai: Shiv Sena President Uddhav Thackeray gestures after he was chosen as the nominee for Maharashtra chief minister's post by Shiv Sena-NCP-Congress alliance, during a meeting in Mumbai, Tuesday, Nov. 26, 2019. NCP chief Sharad Pawar and other leaders are also seen. (PTI Photo) (PTI11_26_2019_000222B)
मुंबई, 30 ऑगस्ट : महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबरच सत्तेत सहभागी आहे. याचीच खंत काँग्रेस काही नेत्यांमध्ये असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसच्या आयडोलॉजीचं काय? असे प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. यावरूनच काहींना काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची नाही आहे आणि नवं नेतृत्व निर्माण होऊन द्यायचं नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज सामना दैनिकातून रोखठोक या लेखातून त्यांनी यावर भाष्य केलं आहे. मागील आठवड्यामध्ये काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित करत पत्र प्रपंच केला होता. यावर याआधीच ‘सामना’च्या अग्रलेखातून राऊत यांनी कडवट टीका केली होती. आज पुन्हा एकदा लेखाच्या माध्यमातून राऊत यांनी ज्या 23 नेत्यांनी पत्रप्रपंच केला. त्यापैकी काहींना अध्यक्ष व्हावे असं वाटत असावं पण त्यांच्यात एका मध्येही राष्ट्रीय नेतृत्व करावं अशी ताकद आणि कुवत नाही अशी बोचरी टीका केली आहे. राज्यात E pass बंद होण्याची शक्यता कमीच, विजय वड्डेटीवारांनी दिली मोठी माहिती जगमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी, शरद पवार, नवीन पटनाईक, के चंद्रशेखर राव हे सर्व मूळचे काँग्रेसवाले आहेत. त्या त्या राज्यातील काँग्रेसचाच जनाधार त्यांनी लुटला आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस हे मूळ काँग्रेसचेच अपत्य आहे. राज्या-राज्यात काँग्रेस असून फक्त मूळ चेहऱ्यावरचे मुखवटे बदलले आहेत. चिंता वाढली! राज्यात मुंबई, पुण्यानंतर तयार होतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट या सगळ्यांनी मुखवटे काढून फेकले तर देशात काँग्रेस एक प्रबळ पक्ष उभारी घेईल. तरुण वर्गाला आज काँग्रेस आकर्षण काय वाटत नाही याचे मंथन सोनिया गांधी यांना पत्र पाठवणाऱ्या 23 नेत्यांनी करायला हवे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.