JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आधी प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर तरुणासोबत..; सांगोल्यातील धक्कादायक प्रकारानं पोलीसही चक्रावले

आधी प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर तरुणासोबत..; सांगोल्यातील धक्कादायक प्रकारानं पोलीसही चक्रावले

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगोला तालुक्यात ही घटना घडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 15 जानेवारी : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगोला तालुक्यात ही घटना घडली आहे. अज्ञाताने तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे. संजय तुकाराम इंगोले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडली असावी असा प्राथमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटंल आहे. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा अंदाज   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील एकतपूर - अचकदानी रोडवर एक तरुण मृत अवस्थेत पडला असल्याचं गस्तीवरील पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मृतदेहाची पहाणी केली असता या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापून हत्या करण्यात आली असावी असं पोलिसांनी म्हटलं आहे.  संजय तुकाराम इंगोले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती सांगोला तालुका पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या