JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shahajibapu Patil : शहाजीबापू नॉट ओके, 15 दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या रस्त्याची मनसेकडून पोलखोल

Shahajibapu Patil : शहाजीबापू नॉट ओके, 15 दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या रस्त्याची मनसेकडून पोलखोल

शहाजी बापू पाटील यांच्या फंडातून रस्त्यांची कामे झाली परंतु निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने त्यांच्यावर मनसेने आरोप केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगोला, 05 नोव्हेंबर : आमदार शहाजी बापू पाटील हे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल मध्ये फेमस झाले. मात्र सांगोला तालुक्यात काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय तो भ्रष्टाचार समद ओके हाय अशी अवस्था झाली आहे. शहाजी बापू पाटील यांच्या फंडातून रस्त्यांची कामे झाली परंतु निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने त्यांच्यावर मनसेने आरोप केला आहे.

आमदार शाहजी बापू पाटील यांनी दिनांक 31 ऑगस्टला मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेल्या सांगोला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 386  या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील मनसे  तालुकाध्यक्ष अक्षय विभुते यांनी केली आहे. दरम्यान याबाबत विभुते यांनी याचा व्हिडिओ व्हायरल केला असल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान पुढच्या 15 दिवसांमध्ये चौकशी करावी व दोषी कॉन्ट्रॅक्टरची लायसन्स जप्त करावेत. अन्यथा  महाराष्ट्र नवनिर्माण सेना रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा :  ‘..अन् फडणवीसांचाच करेक्ट कार्यक्रम झाला’; नाना पटोलेंचा पलटवार

संबंधित बातम्या

शहाजीबापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरे मैदान गाजवणार

आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते १० वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी विठ्ठलाचे दर्शन घेऊन शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त संगेवाडी आणि मांजरी येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे याच गावातून शहाजीबापू पाटील यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, अशी माहिती शिवसेनेचे लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  ‘कोण आला रे…’ सुषमा अंधारेंना अडवलं, आता मुक्ताईनगरमध्ये होणार उद्धव ठाकरेंची सभा!

आदित्य ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेलं आव्हान स्वीकारत ७ नोव्हेंबरला सिल्लोड मतदारसंघात सभेचं आयोजन केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असून सांगोला तालुक्यात सभा घेणार असल्याची माहिती सेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिली. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या