प्रितम पंडित, सोलापूर, 20 डिसेंबर : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये 189 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने 77 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा जिंकून समाधान मानावे लागले. जिल्ह्यात नवीन असणाऱ्या शिंदे गटाने 26 जागा जिंकत सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाला चांगला धक्का बसला. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील गटाने आपले वर्चस्व आबाधित राखले. माढा तालुक्यात आठ जागा जिंकून आमदार बबनराव शिंदे यांनी आपला करिष्मा दाखवला. अक्कलकोट तालुक्यात अटीतटीच्या लढाईत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अकरा जागा जिंकून प्रतिष्ठा राखली. तर काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हात्रे यांना 6 ग्रामपंचायती जिंकता आल्या. दक्षिण तालुक्यातील भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी निसटता विजय मिळवला. उत्तर तालुक्यात माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाला धोबीपछाड देत 8 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवल्या. भाजपला तीन ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागेल. मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील गटाचे वर्चस्व दिसून आले. राष्ट्रवादीने चार जागा आपले वर्चस्व प्राप्त केले. स्थानिक आघाडीने मात्र तीन जागा जिंकून करिष्मा दाखवला. हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदेंवर भुखंडाचे श्रीखंड लाटण्याचा आरोप, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी बार्शी तालुक्यातील बारा ग्रामपंचायत भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र गटाने झेंडा फडकवला आहे. ठाकरे गटाची माजी मंत्री दिलीप सोपल यांना 8 ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. माळशिरस तालुक्याचे भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तालुक्यावर आपली एकहाती सत्ता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. 35 पैकी 23 जागांवर मोहिते पाटील समर्थक विजयी झाले. करमाळा तालुक्यात शिंदे गटाची मोठी सरशी झाली. शिंदे गटाचे नेते नारायण पाटील, रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आमदार संजय मामा शिंदे यांना धोबीपछाड दिली आहे. 30 पैकी 20 जागांवरती बागल आणि पाटील यांच्या समर्थकांनी विजय प्राप्त केला. शिंदे समर्थकांना केवळ दहा जागांवर विजय मिळवता आला. इतर पक्षांच्या गटांचा पराभव झाला. हेही वाचा : बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा; तिघांनी सत्कार केल्याने गावकरीही हैराण
मंगळवेढा तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी एकहाती वर्चस्व गाजवलं. 18 पैकी 13 जागांवर समाधान आवताडे समर्थक पॅनलचे उमेदवार विजयी झाले. पंढरपूर तालुका तालुक्यातील प्रत्येकी चार चार ग्रामपंचायतीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा दिसून आला. माजी आमदार प्रशांत परिचारक राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी आपले वर्चस्व राखले. सांगोला तालुक्यात शिंदे गटाचे ओके आमदार शहाजी बापू पाटील यांनी सहापैकी चार ग्रामपंचायत वर आपले वर्चस्व प्राप्त केले आहे. भाजप 77 जागा जिंकून मोठा पक्ष म्हणून पुढे आला.