सोलापूर, 13 डिसेंबर : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सगळंच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. यामुळे सायबर काइमच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाईन शॉपिंग असो किंवा ऑनलाईन व्यवहार असो ऑनलाइन फ्रॉडचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. यात आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ भक्तांनाही याचा फटका बसला आहे. सोलापूरमधील अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भक्तनिवासाच्या बुकिंगच्या नावे गंडा घातला जात असल्याचं समोर आलंय. मागील एका महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुण्यातील भक्तांची फसवणूक झालीय. इंटरनेटवर भक्तनिवासाची माहिती शोधून ऑनलाईन बुकिंग करणारे भक्त या सायबर गुन्हेगारांकडून नाडले जात आहेत. अशाच प्रकारे रोज 20 ते 25 जणांच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याचंही व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय. याची तक्रार केली असता, आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. हेही वाचा - Aurangabad : प्रदर्शनातील मॉडेल तयार करण्यासाठी शेतकऱ्यावर म्हैस विकण्याची वेळ, Video सायबर क्राईम सध्या दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या गुन्हेगारांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य वेळी सावधनता बाळगणे, तेवढेच महत्वाचे आहे. वेगवेगळ्या प्रकारे हे घोटाळेबाज तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील. कधी अनोळखी नंबर वरून, डायरेक्ट व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ कॉल करून, खोटी ओळख सांगून ते कॉल करतात. इतकंच नाही तर बँकेचा किंवा आर्मीचा अधिकारी असल्याचं सांगत बनाव करून बऱ्याच वेळा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करण्यात येतो.