JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivrajyabhishek: रायगडाच्या पायथ्याला पोलीस छावणीचे स्वरूप; संभाजीराजे उद्या मोठी घोषणा करणार?

Shivrajyabhishek: रायगडाच्या पायथ्याला पोलीस छावणीचे स्वरूप; संभाजीराजे उद्या मोठी घोषणा करणार?

Shivrajyabhishek Din 2021: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक दिन सोहळा उद्या साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

जाहिरात

संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 5 जून: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्याभिषेक दिन (ShivRajyabhishek Din) दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, गेल्यावर्षीपासून कोरोना संकटामुळे रायगडावर मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे. यंदाही शिवराज्याभिषेक दिन हा साध्या पद्धतीने मात्र उत्साहात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) एक महत्त्वाची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे या शिवराज्याभिषेक दिनाला किल्ले रायगडावर रायगड जिल्हा प्रशासनाने फक्त वीस लोकांना जायची परवानगी दिली आहे. शिवराज्याभिषेक दिनापूर्वी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती हे किल्ले रायगडावर दाखल झाले होते. उद्याचा शिवराज्याभिषेक दिन हा साध्या पद्धतीने मात्र उत्साहात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दरम्यान या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडाच्या पायथ्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. तब्बल आठशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत तर मराठा आरक्षणाबाबत संभाजी राजे छत्रपती किल्ले रायगडावरून उद्या महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवभक्तांना माझी विनंती आहे की, कोरोना अद्यापही गेलेला नाहीये त्यामुळे यंदा शिवराज्याभिषेक सोहळा आपण घराघरातच साजरा करावा असंही संभाजीराजेंनी सर्वांना आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठी आडकाठी ठरले ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला एक 6 जूनपर्यंतचं अल्टमेटम दिलं होतं. 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करा अन्यथा रायगडावरून आंदोलनाची सुरूवात होईल असं म्हटलं होतं. संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, मी स्पष्टच सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना… 6 जून रोजी काय झालं शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक यावेळी झाला. 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भावर निर्णय घेतला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका, रायगडावरून आंदोलनाची सुरूवात करणार असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या