JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivsena VS Shinde : शिवसेनेसमोर या 3 चिन्हाचे पर्याय, उद्याच निवडणूक आयोगाकडे करणार दावा?

Shivsena VS Shinde : शिवसेनेसमोर या 3 चिन्हाचे पर्याय, उद्याच निवडणूक आयोगाकडे करणार दावा?

उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या तीन चिन्हाबाबत ठाकरे गट दावा करणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाकडून नव्याने चिन्हाचा शोध सुरू आहे. शिवसेना सध्या 3 चिन्हावर विचार करत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसंच शिवसेना नाव वापरता येणार नाही. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. पण पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आता बदलावे लागणार आहे. ठाकरे गटाकडून तीन पक्ष चिन्हांचा विचार केला जात आहे. उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल या तीन चिन्हांचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या तीन चिन्हाबाबत ठाकरे गट दावा करणार आहे. (Shivsena VS Shinde : ‘धनुष्यबाण’ आधी शिवसेनेकडे नव्हते, असे मिळवले निवडणूक चिन्ह !) केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसंच शिवसेना नाव वापरता येणार नाही. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. पण पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आता बदलावे लागणार आहे. दरम्यान, दिल्ली शिवसेना ठाकरे गटाची सुप्रीम कोर्ट, निवडणूक चिन्ह आणि नवीन नावावर निर्णय घेण्यासाठी बैठक पार पडली. पहाटे 3 वाजेपर्यंत शिवसेना नेते, कायदे तज्ञ आणि सुप्रीम कोर्टातून वकिलासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर नावा संदर्भात तीन प्रस्ताव तयार करण्यात आले असून आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत निवडणूक चिन्ह आणि नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ( ‘तर माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्या..’; रवी राणांची एकनाथ शिंदेंना ऑफर ) तर. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश : 1**) दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.** २) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. ३) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो आयोगाने मंजूर केलेले आणि; (ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात. त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या