JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेना म्हणजे गटारतले बेडूक, गिरीश महाजनांची जीभ घसरली

शिवसेना म्हणजे गटारतले बेडूक, गिरीश महाजनांची जीभ घसरली

‘शिवसेना सत्ता लंपट आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून 4 खासदार निवडून आणावे’'

जाहिरात

'शिवसेना सत्ता लंपट आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून 4 खासदार निवडून आणावे''

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धुळे, 14 मे : ‘शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते अशी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली. तसंच, ‘गटरातील बेंडूक’ म्हणून महाजन यांनी शिवसेनेचा (shivsena) उल्लेखही केला. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीमध्ये सभा पार पडली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर देताना जीभ घसरली. ( अभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; वर्षभराने पुन्हा व्हायरसने गाठलं ) त्याचं उत्तर मतदारांनी दिलं आहे. 10 वर्षांपासून देत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मोठा झाला आहे. सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आमची युती झाली होती. पण आज काय परिस्थिती आहे. आम्हाला जनतेनं पाठिंबा दिला सर्वाधिक जागा दिला आहे. मोदींवर यांना बोलण्याची गरज नाही. यांची लायकी आहे. हे गटारतले बेडूक आहात, अशी टीका महाजन यांनी केली. ‘शिवसेना सत्ता लंपट आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून 4 खासदार निवडून आणावे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस ही आमदार निवडून आले नसते’ अशी टीका महाजन यांनी केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले दरम्यान, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रिपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी दिली. ( माझी गर्लफ्रेंड बिल्डिंगमध्ये अडकली होती; Video कॉलवर तिला धीर देत होतो, पण… ) ‘भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे’ असा टोलाही पाटील यांनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या