JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून त्यांना पोटशूळ उठला; बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून सत्तारांचा आदित्य ठाकरेंवर जोरदार पलटवार

...म्हणून त्यांना पोटशूळ उठला; बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून सत्तारांचा आदित्य ठाकरेंवर जोरदार पलटवार

आज बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जंयती आहे.  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनामध्ये त्यांच्या तैलचित्राचं अनावरण  करण्यात येणार आहे. या अनावरण  कार्यक्रमाला सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र तैलचित्राच्या अनावरणावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. गद्दारांच्या हस्ते तैलचित्राचं अनावरण  होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता यावरून शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. सत्तार यांनी नेमकं काय म्हटलं? आज बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला सत्ताधारी गटाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देखील देण्यात आलं आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी यावरून शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तेत असताना तुम्हाला कधी बाळासाहेब आठवले नाहीत, बाळासाहेबांचे खरे अनुयायी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं मी स्वागत करतो. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करणार असल्यानं ठाकरे गटाला पोटशूळ उठला असल्याचा टोला सत्तार यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा   दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत न्यायालयात लढाई चालू आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष प्रमुखपदाचा कालावधी देखील संपत आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे यांना पक्ष प्रमुखपदी राहाता येणार नसल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या