JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'लबाड बोका ढोंग करतोय' ठाण्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादीत बॅनर वार

'लबाड बोका ढोंग करतोय' ठाण्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादीत बॅनर वार

आज बाळासाहेबांची शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे आमदार आव्हाडांना जशास तसे उत्तर दिले

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 30 जानेवारी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. नगरसेवक फोडण्याच्या आरोपावरून कळव्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यानंतर “लबाड बोका ढोंग करतोय” अशी बॅनरबाजी करून बाळासाहेबांनी शिवसेनेनं जशास तसे उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे 22 नगरसेवक हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे रविवारी कळव्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली होती. ‘खोका बोका, नगरसेवकांनो, स्वत: ला विकू नका, गद्दारी जनता माफ करणार नाही’, असं आवाहन करण्यात आले होते. या बॅनरबाजीतून शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. (‘तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या..’ बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरुन रोहीत पवार यांचा थेट CM वर) त्यानंतर आज बाळासाहेबांची शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे आमदार आव्हाडांना जशास तसे उत्तर दिले आहे. “लबाड बोका ढोंग करतोय” अशा मजकुराचे बॅनर शहर भरात लावण्यात आले आहे. पायाखाली बघा तुमच्या, दुसऱ्याकडे कशाला बोट, नगरसेवक सोडून जातात तर असेल ना तुमच्यातच खोट, असा टोलाही आव्हाडांना लगावला आहे. तसंच, मुंब्रा, कळव्याच्या विकासाचं फुका लाटता श्रेय, आयत्या पिठावर रेघोट्या हेच तुमचे ध्येय, असा टोलाही या बॅनरबाजीतून आव्हाडांना लगावला आहे. राष्ट्रवादीचे 22 नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेटवर आला आहे. तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे. (मुख्यमंत्री, हळदी कुंकू कार्यक्रमाला न आल्याने शिंदे गटाचे नगरसेवक नाराज, म्हणाले…) विशेष म्हणजे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या