JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / या एका सवयीमुळे पत्नीसोबत सतत होतो वाद; शहाजीबापू पाटील यांनी खुलासा करताच पिकला हशा

या एका सवयीमुळे पत्नीसोबत सतत होतो वाद; शहाजीबापू पाटील यांनी खुलासा करताच पिकला हशा

शहाजीबापू (Shahajibapu Patil) म्हणाले, की चिंतन ही माझी फार आवडीची सवय आहे. माझं आणि माझ्या पत्नीचं भांडण याचं मुद्द्यावरुन होतं असतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 13 सप्टेंबर : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे मागील काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांमध्ये हशा पिकवला आहे. यावेळी त्यांनी पत्नीसोबतच होणाऱ्या भांडणाचं कारण सांगितलं आहे. शहाजीबापू म्हणाले, की चिंतन ही माझी फार आवडीची सवय आहे. माझं आणि माझ्या पत्नीचं भांडण याचं मुद्द्यावरुन होतं असतं. मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का, न्यायालयीन कोठडी मुक्काम वाढला मी घराच्या बाहेर वडाच्या झाडाखाली बसलो की, ती म्हणते उगाचचं येड्यावाणी बसलाय. या की आत! घोटाळा असा आहे की चिंतन ही काय दाखवायची गोष्ट नाही. मात्र, यामुळे मला अद्भुत वाटतं, असं ते म्हणाले. यावेळी शहाजी बापूंनी बावड्यातील लहापनीच्या आठवणीही सांगितल्या. वारकरी सांप्रदायाचा वारसा असणारे इंदापूर तालुक्यातील बावडा गावचे पाटील कुटुंबीय आमचे नातेवाईक असल्याने मी महिना महिना बावड्यात असायचो. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर कबड्डी, लोमपाट खेळलोय. यात अनेकवेळा भांडणं झाली. खेळात आम्ही खरं जिंकलेलो असायचो पणं हर्षवर्धन भाऊ पहिल्यापासून चिडके होते, हारलं तरी आम्हाला मारायचे! लांबच्या लांब असलेले ते आम्हाला काय ऐकत नसयाचं. Ashish Shelar Troll : आशिष शेलार पेंग्विन ट्वीटवरून जोरदार ट्रोल, नेटकरी म्हणतात जनाब आशिष शेलार उर्फ कुरेशी मियां ते चिडले की आम्ही पळतं सुटायचो. मी तर एकदा भितीपोटी नारळाच्या झाडावरच चढून बसलो आणि म्हणालो ‘ये आता कसा वर येतोय बघतो.’ शहाजीबापूंनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुढे ते म्हणाले, की निवडणुकीत हार-जीत असते. पडला हा शब्द राजकारणातून बाजूला करायला हवा. एखादा नेता निवडून आला नाही की पडला अशा चर्चेला उधाण येते. मी अशा चर्चा घडल्यावर स्वतःला पाहिलं की कुठे पडलो, काय झालं, कुठे लागलं. अहो उभा आहे धडधाकटं आहे! पडलं आणि आलं हे जिथल्या तिथं सारखं आहे, असंही शहाजीबापू यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या