JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काँग्रेसवर कोणाची वैयक्तिक मालकी नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षालाच घरचा आहेर

काँग्रेसवर कोणाची वैयक्तिक मालकी नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षालाच घरचा आहेर

सोनिया गांधी होत्या विजय मिळत गेला. आमची चूक झाली याआधी आम्ही हे बोलायला हवं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : गुलाब नबी आझाद यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला. यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यंमत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांच्या राजीनामा दिलं त्याचं दु:ख आहे. अनेक वर्ष ते काँग्रेससोबत होते. पक्ष संघटनेत त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. या नेत्याला पक्ष सोडून जावं लागतं तेव्हा वाईट वाटतं, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेरही दिला. काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण - ते म्हणाले की,  सोनिया गांधी होत्या तेव्हा विजय मिळत गेला. आमची चूक झाली याआधी आम्ही हे बोलायला हवं होतं. निवडणूक घेऊन जे निवडून येईल ते मान्य केले पाहिजे. एकाच कुटुंबातील जास्त नको. मग राहुल गांधी कोणत्या कुटुंबातील आहेत, असा सवाल करत काँग्रेस पक्षाला वाचवायचा असेल निवडणूक घ्यायला हवी, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडे घटनेची नोंद आहे. गांधी कुटुंबाने दिले. त्यात समाधान मानले पाहिजे. ही मुघल सलतन आहे का? लोकशाही पद्धतीने नेमणुका होत नाही, याचा गांभीर्याने विचार करणार आहोत का? असे म्हणत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.  ते म्हणाले की, डिसेंबर महिन्यात सोनिया गांधींसोबत आम्ही 5 तास चर्चा केली. त्यात चिंतन शिबीर, निवडणुका घेण्याचं मान्य केले. मात्र, त्यालाही बराच वेळ झाला. त्यानंतर केरळ, आसाम, यूपी, पंजाबच्या निवडणुकीत पराभव झाला. पंजाबचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय कुणी घेतला? असा सवालही त्यांनी केला. हेही वाचा -  माझ्या तमाम हिंदू.. राज ठाकरे यांचं ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून नवं आवाहन, म्हणाले.. जेष्ठांना टारगेट करण्याचा प्रयत्न - राहुल गांधी अध्यक्ष असतील तर काय हरकत नाही. मात्र, ते निवडणुकीतून समोर आले पाहिजे. जी-23 लोकांनी जे पत्र दिले ते गोपनीय पत्र लीक झाले. त्यानंतर राजकारण सुरू झाले. आमची बंडखोरी करण्याचा विषय नव्हता. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या