JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सर्वांच्या डोळ्यांसमोर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा Video

सर्वांच्या डोळ्यांसमोर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा Video

ही घटना अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये घडली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमित राय, प्रतिनिधी ठाणे, 26 सप्टेंबर : अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटल्याची घटना समोर आली आहे. ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये ही घटना घडली. स्कूल बस उलटल्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सुदैवाने एकही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही. तर याप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक खाजगी मिनी स्कूल बस आज सकाळच्या सुमारास उलटली. या बसमध्ये सुमारे 17 ते 18 विद्यार्थी होते. बस उलटल्यानंतर स्थानिकांनी बसमध्ये चढून विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढले. या अपघातात दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी शाळा प्रशासनाने सांगितले की, ही स्कूल बस नसून खासगी बस आहे. या बसच्या माध्यमातून मुलांना शाळेत आणले जात होते. बस उलटल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

संबंधित बातम्या

ही घटना अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये घडली. बसमध्ये अंबरनाथ रोटरी स्कूलचे विद्यार्थी होते. बस ग्रीन सिटी संकुलात आली असता बस चालकाने रिव्हरवुड बिल्डिंगसमोरील उतारावर बसला मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी बसमालकाविरोधात संताप व्यक्त केला. हेही वाचा -  अंत्यसंस्काराऐवजी महिलेचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले नातेवाईक, काय आहे प्रकरण? या बसचा विमा उतरवला नव्हता. तसेच बस अत्यंत जुनी झाली आहे. यावर ही बस शाळेसाठी नसल्याचे स्पष्टीकरण रोटरी शाळेच्या व्यवस्थापकांनी दिले आहे. पालकांनी त्यांच्या सोयीनुसार बस निवडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवल्याचे व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे. तसेच या बसच्या मालकाला आम्ही समज देऊ, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. बस उलटल्याच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या