JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पालघरमधील Shocking Video : दुचाकीला धडक देऊन स्कूलबस पलटली, एकाचा जागीच मृत्यू, 9 विद्यार्थी जखमी

पालघरमधील Shocking Video : दुचाकीला धडक देऊन स्कूलबस पलटली, एकाचा जागीच मृत्यू, 9 विद्यार्थी जखमी

पालघरमध्ये मॅजिक स्कूल बसचा अपघात झाला आहे. बाईकला धडक दिल्याने हा अपघात झाला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पालघर, 25 जुलै : तीन दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात कार आणि दुचाकीचा अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच अगदी तीनच दिवसात पालघर जिल्ह्यात अपघाताची दुसरी बातमी समोर आली आहे. एका स्कूल बस आणि बाईकचा अपघात झाला आहे. पालघरच्या चुन्नाभट्टी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं - पालघरमध्ये मॅजिक स्कूल बसचा अपघात झाला आहे. बाईकला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात 9 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही स्कूल बस चाणक्य इंग्लिश हायस्कुलची आहे. चुना भट्टी येथे बाईकला धडक दिल्यानंतर ही स्कुल बस पलटी झाली. यानंतर जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा -  एकतर्फी प्रेमात झाला वेडा, कतरिनासोबत करायचे होते लग्न मात्र, पोहोचला थेट तुरुंगात तीन दिवसांपूर्वीही झाला एक अपघात - जव्हार येथील बांधकाम व्यावसायिक हर्षद मेघपुरीया हे विक्रमगड येथून आपल्या कारने चालकासह जव्हारच्या दिशेने निघाले होते. जव्हार-विक्रमगड मार्गावर वाळवंडेजवळ भरधाव वेगात असलेल्या कारने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. या भयानक अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर असलेला तिसरा व्यक्ती आणि कार चालकदेखील या अपघातात गंभीर जखमी झाले. दरम्यान, पालघरमध्ये मागच्या तीन दिवसात हा दुसरा अपघात झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या