सातारा, 05 डिसेंबर : संक्रांतीचा सण जवळ आला आहे. या सणात सुगडाच्या पूजेला विशेष महत्त्व असते. कुंभारवाड्यात हे सुगड बनविले जातात. सध्या या कामांनी वेग धरला आहे. दिवाळीनंतर वर्षातला हा एकच सण कुंभारांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचे काम करतो. आता ह्या व्यवसायात देखील तंत्रज्ञानाने जागा घेतली आहे आणि वेळेची बचत आणि उत्पादनात वाढ होत असल्याचे साताऱ्यातील संजय कुंभार सांगतात. शेतातून तसेच तलावातून आणलेली माती चाळून पाण्यात भिजवली जाते. त्यानंतर ती पायाने तुडवली जाते. मातीचा गोळा गोल फिरणाऱ्या चक्रावर ठेवून त्याला आकार दिला जातो. या कसरतीत कुटुंबातील प्रत्येक सदस्य मदत करतो, ह्यात काळानुरुप मोठे बदल झाले आहेत. जुन्या काळात लाकडी चाक वापरलं जायचं ते एका खुंट्यावरती बसवलं जायचं, बॅलन्स होईल असं त्याला काटीनं फिरवून वेग दिला जायचा आणि मग त्यावर चिखलाचा गोळा ठेवून त्यापासून चार -पाच सुगड्या बनवल्या जायच्या. ही क्रिया वारंवार करायला लागायची यात शारीरिक मेहनत आणि वेळही अधिक लागत असे. अंबाबाई मंदिर करणार पर्यावरणाचा जागर, भाविकांना मिळणार वृक्षप्रसाद, Video तंत्रज्ञानाची मदत आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं लाईटवर चालणारे चाक आलं आहे. त्यासाठी जास्त जागाही लागत नाही. थोड्या जागेत ठेवून एकाच वेळी 40 ते 50 सुगड्याचा चिखल चाकावर ठेवला येतो. यातून एकदा चिखल घेतला की चार वेळा उठण्याचा विषय येत नाही. तसेच चाक फिरवण्यासाठी वेळ जात नाही. उत्पादनात वाढ होते, तसेच वेळीचेही बचत होते. या मशीनची किंमत 16 ते 18 हजार रुपये आहे. यातून सुगड उत्पादन देखील वाढते. नवऱ्या मुलाची मोठी काळजी मिटली, भाड्यानं मिळतील लग्नाचे कपडे, Video योग्य मोबदला मिळत नाही आधुनिक काळात वाढती प्रगती पाहता कुंभार समाज आजही गरिबीच्या परिस्थितीच आपला व्यवसाय करत आहे. प्रगतीच्या वाटेवर जात असताना मातीपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या किमती मात्र, जशाच तशा आहेत. प्रचंड मेहनत आहे. मात्र, योग्य मोबदला मिळत नसल्याचे साताऱ्यातील संजय कुभार यांनी सांगितले.