सातारा, 10 मे: साताऱ्यातून (Satara) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घराबाहेर झोपलेल्या तरुणाची धारदार (Sharp Weapon) शस्त्रानं गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत केवळ 30 वर्षांचा होता. साताऱ्यातील फलटण तालुका येथील पाडेगावच्या हद्दीतील शिवचा मळा येथे ही घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव राहुल नारायण मोहिते असं आहे. मृत राहुल हा ट्रक ड्रायव्हर होता. कारल्याच्या बिया खाल्ल्याने `हे` आजार राहू शकतात नियंत्रणात राहुलच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्या झाल्याचं समजताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरु केला असून अधिक तपास सुरु आहे. राहुलची हत्या कोणत्या कारणासाठी झाली हे मात्र समजू शकले नसून पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.