सातारा, 09 सप्टेंबर : सातारा जिल्हा पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने दोन्ही राजेंमधील वादाची जोरदार चर्चा रंगली आहे. मागच्या काही दिवसांपासून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात सातारा महापालिकेवरून जोरदार आरोप पत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. (udayanraje vs shivendraraje)उदयनराजे यांची सातारा पालिकेत सत्ता असल्याने विरोधी बाकावरील शिवेंद्रराजे यांनी जोरदार टीका केली आहे. शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजेंवर जोरदार टीका केली आहे.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीत सातारकर उदयनराजेंच्या आघाडीला धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले आहे. याचे फस्ट्रेशन त्यांना आले आहे. आगामी पालिका निवडणुकीत त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ येणार आहे. 50 नगरसेवक निवडून आणण्याची गॅरंटी आहे तर त्यांचा तीळपापड का होतो? सुंदर काम केले तर का घाबरता ? सातारा विकास आघाडीचे राजकारण संपुष्टात आले आहे. सातारा पालिकेतून यांचा कडेलोट होणार आहे, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण; तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप
उदयनराजेंचा आमदारकीला आणि त्यानंतर खासदारकीला असा दोनवेळा पराभव झाला. हा त्यांचा राजकीय प्रवास आहे. बायोमायनिंगचे काम बोगस झाले आहे. प्रशासकीय इमारत जागा हस्तांतरणात गौडबंगाल आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे काम जादा दराने टेंडर भरणाऱ्या ठेकेदारालाच का दिले?
नगर पालिकेत एसीबीने केलेल्या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यातील संभाषणानुसार 5 टक्के पार्टी फंड कुणाला जातो? सत्तेत तुमचीच आघाडी आहे. मग सातारा विकास आघाडीचा कडेलोट करणार का? असा सवाल करत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर पत्रकार परिषदेत पलटवार केला.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्ह्याचा होणारा विकास माझ्यामुळेच आणि काम रखडल्यास बाकीचे लोकप्रतिनिधी जबाबदार अशी उदयनराजेंची भूमिका आहे. त्यांनी दोन-तीन दिवस मुंबईचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनाही ते भेटले. त्यानंतर त्यांचा आविर्भाव पाहिला. चिडून, चवताळून बोलण्यासारखं मुंबईत काय झालं? कदाचित त्यांचा हा दौरा अपेक्षेप्रमाणे झाला नाही का? अपेक्षेप्रमाणे त्यांना फळ मिळाले नसावे, असे माझे रिडिंग आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना कोकणातून पुन्हा धक्का, भास्कर जाधवांचं प्रमोशन होताच शिंदेंकडे इनकमिंग
मुंबईत काहीतरी बिनसले आहे. त्यांच्या नेहमीच्या टिकेत कुचकेपणा असायचा पण आता त्यांच्या बोलण्यातून राग व्यक्त होवू लागला आहे. मला मात्र फरक पडत नाही. मला अल्हादपणे आमदारकी मिळाली असे ते सांगतात. विधानसभेला त्यांचा पराभव करुन 10 हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो, हे त्यांनी विसरु नये. त्यांचा यातून बालिशपणा दिसून येतो.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सध्याची मध्यवर्ती नगरपालिका इमारत सुस्थितीत असताना 70 कोटी खर्चून नवी प्रशासकीय इमारत बांधण्याचा घाट का घातला हे लोक जाणून आहेत. नवी इमारत बांधावी, अशी लोकांची मागणी होती का? असा काय कारभार वाढलाय? जुन्या इमारतीतून कारभार करताना काय दिले लावले? कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी ऑडिटोरियम व्हावे, या हेतूने भाऊसाहेब महाराजांनी ती जागा टाऊन हॉलसाठी आरक्षित केली. संबंधित जागा 53 गुंठे आहे.