JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Satara Shambhuraj Desai : शंभुराज देसाईंनी गुवाहाटीत बसून हलवली सूत्र, कारखाना बिनविरोध करत म्हणाले,..

Satara Shambhuraj Desai : शंभुराज देसाईंनी गुवाहाटीत बसून हलवली सूत्र, कारखाना बिनविरोध करत म्हणाले,..

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासोबत असलेले शंभुराज देसाई (satara shambhuraj desai) यांनी गुवाहाटीमध्ये बसून सातारा जिल्ह्यातील सुत्रे हलवत असल्याचे दिसून आले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासोबत शिवसेनेत बंडखोरी (shiv sena) करत मागच्या 6 दिवसांपासून सुरत मार्गे गुवाहाटी (eknath shinde in guwahati) गाठलेल्या बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढणार आहे. दरम्यान त्यांचा मुक्काम पुढचे दोन ते तीन दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शंभुराज देसाई (satara shambhuraj desai) यांनी गुवाहाटीमध्ये बसून सातारा जिल्ह्यातील सुत्रे हलवत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आपला कारखाना (balasaheb desai sugar factory) बिनविरोध करून दाखवला आहे.  

शंभुराज देसाई यांचा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक बिनविरोध  करत संचालक झाल्याने त्यांचे एकनाथ शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी गुवावाही येथील हॉटेलमध्ये अभिनंदन करण्यात आले. याबाबत स्वत: शंभुराज देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. देसाई यांनी फोटोही टाकल्याने त्यांच्यासोबत आमदार एकत्र असल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान काल देसाई यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

हे ही वाचा :  ‘5 मिनिटांपूर्वी बंडखोर आमदारांसोबत बोलणं झालं; मविआ सरकार आहे आणि राहाणार’, राऊतांचा दावा

संबंधित बातम्या

देसाई फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले…

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध संचालक व कारखान्यावर आपल्या कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलची सत्ता स्थापन केल्याबद्दल मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी सत्कार आणि अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे सहकारी आमदार उपस्थित होते. ही परिवर्तनाची नांदी आहे. शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.

जाहिरात

शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर निदर्शने

बंडखोरांना जाऊन मिळालेल्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील घरासमोर आज संतप्त शिवसैनिकांनी धडक देऊन जोरदार निदर्शने केली. देसाई यांच्या कृतीचा धिक्कार करत ‘गद्दारांना माफी नाही’, असे शिवसैनिकांनी यावेळी सुनावले. शिवसेनेने मानसन्मान, मंत्रिपद देऊनही देसाई यांनी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज दुपारी तीनच्या सुमारास पोवई नाक्यापासून देसाई यांच्या घराच्या दिशेने कूच केले.

जाहिरात

हे ही वाचा :  भ्रष्टाचाराच्या आरोपात IAS ऑफिसरला अटक, मुलाची हत्या केल्याचा पोलिसांवर आरोप

‘आवाज कुणाचा… शिवसेनेचा’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘गद्दारांना माफी नाही’, अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी पोवई नाक्याचा परिसर दणाणून सोडला. देसाई यांच्या घरासमोर त्यांनी निदर्शने केली. या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, सातारा तालुकाप्रमुख दत्तात्रय नलावडे, कोरेगाव तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अर्जुन मोहिते, रमेश बोराटे, गणेश यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या