मुंबई, 8 जानेवारी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्यपालांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी त्याबाबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. आता यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा एकेरी शद्बात उल्लेख केला. आम्ही पूर्वीपासून या मुद्द्यावर लढतच आहोत. मात्र जे सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत, ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. नेमकं काय म्हटलं संजय राऊत यांनी? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्यापालांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा एकेरी शद्बात उल्लेख केला. आम्ही पूर्वीपासून या मुद्द्यावर लढतच आहोत. मात्र जे सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? आम्हाला असं वाटत केंद्रातला एखादा मंत्री तरी या विषयावर राजीनामा देऊन महाराष्ट्रात परत येईल. जो हा अपमान सहन करत आहेत ते गांंxxची अवलाद आहेत. असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. हेही वाचा : अनेक राज्यपाल पाहिले पण असा राज्यपाल..; शरद पवारांचा पुन्हा कोश्यारींवर हल्लाबोल बावनकुळेंवर निशाणा दरम्यान यावेळी बोलताना राऊत यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. बीकेसीच्या सभेमध्येच मी औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन सांगितलं होतं. औरंगजेबाचा बाप हा गुजरातचा सुभेदार होता. त्यामुळेच भाजप नेते औरंगजेबाला औरंगजेबजी असं बोलत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.