मुंबई, 20 डिसेंबर : राज्यातील अनेक भागामध्ये तापमानात घसरण झाली आहे. हवामान खात्यानं यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुणे आणि परिसरात गारवा वाढला आहे. पुण्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही तापमानात घट झाली आहे. राजधानी मुंबई शहराच्या तापमानातही सोमवारी घट झाली. मुंबईतील कुलाबा वेधशाळेत किमान 23.2 अंश सेल्सियस तर सांताक्रझ वेधशाळेत 20.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र पुणे शहरात 11.2 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुरंदर, दौंड इंदापूर, नारायणगाव, तळेगाव या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्येही तापमानात घट झालीय. कोल्हापूरमध्ये दिवसभरात कमाल तापमान 32 अंश तर किमान 16 अंश असेल. सांगलीमध्ये किमान 16 अंश सेल्सियस तापमानाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तर सोलापूरमध्ये सोमवारी दिवसभरात 16.5 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्र पुणेप्रमाणेच नाशिकमध्येही थंडीचा कडाका वाढलाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 16.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. तर नाशिकमध्ये किमान 16 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर, अहमदनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश तर किमान 16 अंश सेल्सियस असेल, असा अंदाज आहे. मराठवाडा मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये 10.4 अंश सेल्सियस किमान तापनाची नोंद झालीय. जालनामध्ये 13.5, परभणीमध्ये 13.1 तर उदगीरमध्ये 14 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अॅप आता नव्या रुपात विदर्भ मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही थंडीचा जोर वाढलाय. नागपूरमध्ये 12.4 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे. वर्ध्यात 13.0 तर अमरावतीमध्ये 13.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात 15 पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली असून सर्वात कमी किमान तापमान गोंदियामध्ये 10.5 अंश सेल्सियस इतके नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.