सांगली, 30 नोव्हेंबर : सांगली आणि मिरज शहर सध्या भटक्या कुत्र्यांच्या विळख्यात सापडले आहे. या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या नागरिकांवर हल्ले चढवत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुमारे आठ ते दहा जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. हल्ल्यामुळे नागरिकांच्या मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, नागरिकांनी भटके कुत्रे पकडून महापालिका प्रशासनाच्या दारात सोडण्याचा इशारा दिला आहे. सांगली आणि मिरज शहर सध्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली सापडले आहे. दोन्ही शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या खुले आमपणे फिरत आहेत. या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांकडून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लक्ष केलं जात आहे. शहरातील रस्ते चौक आणि कल्याण या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांचा हैदोस रोजरासपणे पाहायला मिळतोय. दिवसा आणि रात्री ही भटकी कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. आणि यातूनच नागरिकांवर हल्ले करून त्यांचे लचके तोडली जात आहेत. Video : स्टोन क्रशरमुळे द्राक्ष बागेवर कुऱ्हाड, अधिकाऱ्यासमोर शेतकरी ढसाढसा रडला हल्ले वाढतच आहेत दोन दिवसांपूर्वी मिरज शहरात भटक्या कुत्र्यांच्या टोळीकडून सहा जणांवर हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये एका पाच वर्षीय बालकासह पन्नास वर्षीय वृद्धाचा देखील समावेश होता. ही घटना घडतेच त्याच्या दोन दिवसांनी सांगली शहरातल्या संजय नगर या ठिकाणीही भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळाला. या भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर हल्ले चढवले आणि चावा घेऊन गंभीर जखमी केले. औरंगाबादमध्येही गोवरचा शिरकाव, मुलांचे प्रमाण मोठं असल्यानं पालकांना टेन्शन! प्रशासनाचं दुर्लक्ष दिवसेंदिवस सांगली महापालिका क्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून श्वान पथक देखील नियुक्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाकडून प्राणिमित्र सामाजिक संघटना आणि आरोग्य विभागाची एक बैठक देखील घेण्यात आली. ज्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करण्याचं ठरवण्यात आलं. मात्र, नसबंदीचा फार्स काही दिवसांपुरताच ठरला. शहरातल्या भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत वारंवार नागरिकांकडून पालिका प्रशासन स्थानिक नगरसेवक यांच्याकडे तक्रारी करण्यात येतात. मात्र, पालिका प्रशासनाकडून भटकी कुत्री पकडण्यामध्ये हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.