JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli : साखरेपेक्षा चिक्कीचा गूळ खातोय भाव, पाहा काय आहेत दर ? Video

Sangli : साखरेपेक्षा चिक्कीचा गूळ खातोय भाव, पाहा काय आहेत दर ? Video

गुळाची मागणी बाजारात वाढली असल्याने दर देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 29 डिसेंबर : साखरेच्या तुलनेत दिवसेंदिवस गुळाची मागणी वाढत आहे. गुळापासून अनेक पदार्थ बनविले जात आहेत. परिणामी गुळाची मागणी बाजारात वाढली असल्याने दर देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. सांगली   कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील गूळ पेठेत काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यास क्विंटलला 4 हजार 770 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे.   सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गूळ घरे सुरू झाले आहेत. गतवर्षीपासून गुळाला चांगला भाव आहे. याशिवाय उसाचे वाढलेले उत्पादन पाहता बहुतांशी शेतकरी गुऱ्हाळ घराकडे वळल्याचे चित्रही दिसत आहे. त्यामुळे यंदा सांगलीच्या बाजारपेठेत विक्रमी गुळाचे आवक होण्याची शक्यता व्यापारातून व्यक्त केली जात आहे. बाजारात आवक वाढल्यानंतर दराच्या घसरणीवर परिणाम होणार नाही याकडेही गूळ उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आवक वाढली तरी दरात तेजी मार्केट यार्डात नवीन गुळाची आवक वाढली आहे. बाजारात आवक वाढली असली तरी भावही चांगला मिळत असल्याचे चित्र आहे. मार्केट यार्डातील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुळाचे सौदे काढले जातात. गत आठवड्यापासून बाजारात गुळाची आवक वाढली आहे. आगामी संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे याशिवाय दरही स्थिर राहण्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धेचं आयोजन,वाचा कशा पद्धतीनं होता येईल सहभागी पंचलिंगेश्वर आणि कंपनी या दुकानामधील गुळाच्या सौद्यामध्ये शेतकरी सुरेश मारुती पुणेकर (निडगुंदी, जि. बेळगाव) यांच्या अर्धा किलो बॉक्स पॅकिंगमधील चिक्की गुळास चांगला दर मिळाला आहे. गूळ राजेश ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केला आहे. उंचच उंच ऊस ते प्रचंड रेडा! कृषी प्रदर्शनात पाहा कशाची हवा, Photos यंदा चांगला भाव गूळ सौद्यामध्ये गूळ भेलीस व गूळ व्यास क्विंटलला कमीत-कमी 3 हजार 200 व जास्तीत जास्त 4 हजार 770 रुपये इतका दर मिळाला आहे. गूळ सौद्यासाठी आडते, व्यापारी, खरेदीदार शेतकरी उपस्थित होते. गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपला गूळ विक्रीसाठी सांगली बाजार समिती येथे घेऊन यावे. शेतकऱ्यांसाठी चालू असणारी शासनाची हळद, बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक मंगेश सुरवसे, महेश चव्हाण यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या