JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli : पिकांवर रात्री येणाऱ्या संकटावर शेतकऱ्यानं शोधला उपाय, पाहा Video

Sangli : पिकांवर रात्री येणाऱ्या संकटावर शेतकऱ्यानं शोधला उपाय, पाहा Video

सांगलीतील द्राक्ष उत्पादकांवर रोज रात्री एक संकट ओढावत असे. या संकटावर अखेर शेतकऱ्यांनीच एक उपाय शोधला आहे. त्यामुळे त्यांच्या पिकांचं संरक्षण होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 14 डिसेंबर :   कधी अवकाळी पाऊस, कधी तापमानातील चढउतार तर बाजारभाव यामुळे शेतकरी संकटात सापडतो. हे कमी की काय, आता शेतकऱ्यासमोर भयंकर वटवाघळांचे संकट उभे राहिले आहे. थवेच्या थवे द्राक्ष बागांवर हल्ला चढवत आहेत. काढणीला आलेल्या द्राक्ष पिकाचे यात अतोनात नुकसान होत आहे. वटवाघळांच्या या नव्या संकटाला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना समोरे जावे लागत आहे. वाळवा परिसरात सुमारे अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रात द्राक्ष पीक घेतले जाते. या परिसरात काळी द्राक्षे मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या भागात आर्द्रता जास्त असल्यामुळेच काळी द्राक्षे चांगली येतात आणि त्यांना दरही चांगला मिळतो. यावर्षीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने बागा वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. यातून सुटका मिळताच आता शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे. तेलबिया पिकांची लागवड घटली, सूर्यफूल नामशेष होण्याच्या मार्गावर रात्रीत द्राक्षांवर हल्ले  आता द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या हल्ल्यांचे एक नवीनच संकट घोंघावत आहे. पण या हुशार शेतकऱ्यांनी त्यावर देखील एक शानदार उपाय शोधून काढला आहे. त्यांनी चक्क मासे पकडण्यासाठी कोळी लोक जी जाळी वापरतात ती जाळी द्राक्ष बागांवर अंथरून वटवाघळांच्या होणाऱ्या हल्ल्यांना चांगलीच मात दिली आहे. वटवाघळे द्राक्ष बागेवर रात्री हल्ले करतात. आणि आपल्या टोकदार चोचीने द्राक्ष मणी फोडतात. सकाळी पाहिले तर बागेत द्राक्षांचा अक्षरशः सडा पडलेला दिसून येतो. आणि शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान होते. सामान्य रुग्णांनी काय करायचं? शासकीय रुग्णालयात महिनाभरापासून औषधांचा तुटवडा यापूर्वीचे उपाय फेल आता ही जाळी अंथरल्याने वटवाघळे द्राक्षांच्या मण्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे द्राक्ष बागांचे नुकसान टळत आहे. यापूर्वी शेतकरी मोठे मोठ्या पॉवरचे बाब लावून वटवाघळांच्या हल्ल्यावर तोड काढण्याचा प्रयत्न करत होते. पण हे अत्यंत खर्चीक असल्याने सर्वच शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. फटाके लाऊन वटवाघळांना हुसकावून लावणे प्रॅक्टिकली शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी हा माशांची जाळी लावण्याचा जुगाड आता अमलात आणला आहे. आणि तो चांगल्या प्रकारे वर्क आऊट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान वाचत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या