सांगली, 19 जानेवारी : अल्पवयीन गर्भवतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली जिल्ह्यातील प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकार उघडकीस आले आहेत. मागील दोन महिन्यात पाच घटना उघडकीस आल्या आहेत. तर तासगाव मधील एक अल्पवयीन गर्भवती माता आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून बालविवाह रोखण्यात प्रशासन कुठे तरी कमी पडत असल्याचे स्पष्ट आहे. लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय 18 आणि वराचे 21 पेक्षा कमी असू नये, असे कायदा सांगतो. मात्र, आजही समाजात लपूनछपून बालविवाह केले जात आहेत.मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन नवविवाहितेमुळे बालविवाहाचे प्रकार उघडकीस आले आहेत. रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती मागील दोन महिन्यात तब्बल पाच घटना समोर आले आहेत. विटा, तासगाव आणि नाशिकमधील एक तर रायगड मधील दोन अल्पवयीन विवाहिता प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये तासगाव तालुक्यातील एक अल्पवयीन सतरा वर्षीय गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर तिच्या बाळाचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. तसेच अन्य अल्पवयीन विवाहितांची माहिती रुग्णालयाने पोलीस विभागाकडे पाठवली आहे.
आरोग्यास धोका बाल विवाह करणे एक तर कायद्याने गुन्हा आहे आणि बाल वयात मुलीचे लग्न केल्यास मुलीच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बालविवाह करू नयेत असं वारंवार आवाहन करून सुद्धा अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ग्रुप तयार करून शोधला बंगला, पोलिसांनी सांगितला शहर हदरवणाऱ्या दरोड्याचा प्लॅन बालविवाह करणे गुन्हा रुग्णालय प्रशासनाकडून अल्पवयीन गर्भवतीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याबाबत चौकशी करतात. पत्नीचे आणि पतीचे आईवडील आणि पतीवर बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. जर त्या पोलीस ठाण्याच्या बाहेरील प्रकरण असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तो गुन्हा वर्ग केला जातो. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे मात्र ,अजूनही अशा प्रकारे बालविवाह समाजात केले जात आहेत त्यामुळे सामाजिक जनजागृती बरोबरच प्रत्येकाने स्वतःहून बालविवाहास विरोध करणे गरजेचे आहे.