JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli Miraj Crime : सांगली : मिरजेतील भर चौकात सराईत गुन्हेगाराचा खून, पानटपरी फोडल्याचा राग अनावर

Sangli Miraj Crime : सांगली : मिरजेतील भर चौकात सराईत गुन्हेगाराचा खून, पानटपरी फोडल्याचा राग अनावर

सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. सांगलीपासून 6 किमी अंतरावर असलेल्या मिरजेत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Sangli Miraj Crime)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 18 सप्टेंबर : सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. सांगलीपासून 6 किमी अंतरावर असलेल्या मिरजेत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Sangli Miraj Crime) मिरजेतील रेल्वे स्थानक रस्त्यावरील अनधिकृत पानटपरी फोडण्याच्या रागातून सराईत गुन्हेगार जिलानी इसामुद्दीन कुडचीकर (वय 47, रा. बागलकोट, कर्नाटक) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी सराईत गुन्हेगार गणेश खन्ना नायडू (वय 31, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. नायडू याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नायडू व मयत जिलानी कुडचीकर हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. दरम्यान ते मिरजेत राहत असल्याने एकमेकांना चांगले ओळखतात. रेल्वे स्थानक रस्त्यावर गणेश नायडू याची अनधिकृत पान टपरी आहे, या पानटपरीवर जिलानी कुडचीकर याची रोज येजा असायची. दरम्यान गुरुवारी (दि. 15) रोजी जिलानी कुडचीकर हा घरी जेवण करून बाहेर पडला होता.

हे ही वाचा :  कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, रुग्णालयात गेल्यानंतर भयानक वास्तव समोर

संबंधित बातम्या

त्यानंतर तो गणेश नायडू यांच्या पान टपरीजवळ आला. जिलानी याने गणेशकडून काही रक्कम घेऊन तेथून निघून गेला होता. परंतु, शुक्रवार (दि. 16) रोजी पहाटे जिलानी याने गणेश याची पानटपरी  फोडून दुकानातील साहित्य विस्कटून काही रोख रक्कम व सिगारेट पाकीट चोरून नेल्याबाबत गणेश याला माहिती मिळाली होती.

जाहिरात

जिलानी याने पान टपरी फोडल्यामुळे संतापलेला गणेश हा मध्यरात्रीपासूनच जिलानी याच्या मागावर होता. परंतु शुक्रवारी पहाटे जिलानी हा रेल्वे स्थानक रस्त्यावरील एका मंदिरासमोर आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर गणेश नायडू देखील त्या ठिकाणी आला. यावेळी गणेश याने जिलानी याला पान टपरी फोडल्याबाबत विचारणा केली. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारीचा प्रकार घडला. गणेश याने जिलानी याला केलेल्या बेदम मारहाणीमुळे जिलानी बेशुद्ध झाला.

जाहिरात

हे ही वाचा :  6 वर्षाच्या मुलीसह महिलेची टेरेसवरुन उडी घेत आत्महत्या; पती म्हणाला ‘3 दिवसांपासून बोलत होती हे एकच वाक्य’

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे जिलानी याचा मृत्यू झाला. जिलानी कुडचीकर यांच्या खून प्रकरणी गणेश नायडू या सराईत गुन्हेगाराला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीराज फडणीस अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या