JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'आई मी सुट्टीवर येणार आहे'.. सांगलीच्या जवानाचे हे शब्द ठरले शेवटचे; बंगालमध्ये निधन

'आई मी सुट्टीवर येणार आहे'.. सांगलीच्या जवानाचे हे शब्द ठरले शेवटचे; बंगालमध्ये निधन

महाराष्ट्रातील सुपूत्राचे पश्चिम बंगालमध्ये अकस्मात निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. रवींद्र नारायण नरळे (Jawan Ravindra Narale) असं या जवानाचं नाव आहे.

जाहिरात

(File Photo)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 23 मे : सांगलीतील मिरज तालुक्यातील कुपवाड येथील रवींद्र नारायण नरळे (Jawan Ravindra Narale) या जवानाचं पश्चिम बंगाल येथील पाणागड येथे सेवा बजावताना अकस्मात निधन झालं. नरळे आर्मी मेडिकल कोअर (AMC) 189 मिलीटरी हॉस्पिटल पाणागड (Panagarh West Bengal) येथे नाईक या पदावर सेवा बजावत होते. या बातमीनंतर कुपवाड गावावर शोककळा पसरली आहे. मयत जवान रवींद्र नरळे मुळ गोंधळेवाडी ता. जत, जि. सांगलीचे सुपूत्र आहेत. कुपवाड (ता. मिरज) येथील अहिल्यानगर, न्यू विजयनगर कुपवाड भागात कुटुंबीयांसह वास्तव्य करत होते. कारखाना परिसरातील शांतीनिकेतन विद्यालयामध्ये त्यांनी इयत्ता दहावी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर सन 2005 साली ते भारतीय सैन्यदलात भरती झाले. पश्चिम बंगालच्या पाणागड येथे सेवा बजावत असताना त्यांच्या अकस्मात निधनाची घटना घडली. घटनेची माहिती रविवारी जवान नरळे यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचे पार्थिव पाणागडहून पाठविण्यात आलं असून मंगळवारी अंत्यविधीसाठी सांगली येथे दाखल होणार आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

आता सत्ता परिवर्तनाची लढाई नाही तर…, फडणवीसांचा सेनेला थेट इशारा

संबंधित बातम्या

आई मी सुट्टीवर येणार आहे निधन झालेल्या जवान रवींद्र नरळे यांनी शनिवारी आपल्या आईशी फोनवरून बोलणं झालं होतं. त्यावेळी ते म्हणाले ‘आई मी लवकरच सुट्टीवर येणार आहे तू काळजी करू नकोस. सांगलीला येण्यासाठी गाडीमध्ये बसताच मी तुला फोन करेन’ जवान नरळे यांचा त्यांच्या आईशी तो शेवटचा फोन होता. मुलाच्या आठवणीने आईला अश्रू अनावर होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या