JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '...तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल' काँग्रेसला शिवसेनेचा सल्ला

'...तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल' काँग्रेसला शिवसेनेचा सल्ला

Saamana Editorial: शिवसेनेनं प्रसाद यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana Editorial)अग्रलेखात भाष्य केलं आहे. शिवसेनेनं या अग्रलेखात काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाबद्दल राजकीय सल्लाही दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जून: दोन दिवसांपूर्वी काँग्रेसला (Congress) चांगलाच फटका बसला आहे. काँग्रेस नेते जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. आता शिवसेनेनं प्रसाद यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana Editorial)अग्रलेखात भाष्य केलं आहे. शिवसेनेनं या अग्रलेखात काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाबद्दल राजकीय सल्लाही दिला आहे. तसंच पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जितीन प्रसाद यांचं पक्षांतर झाल्याचा मुद्दा शिवसेनेनं सविस्तर मांडला आहे. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं काँग्रेसला दिला आहे. हेही वाचा-  न्यायालयाकडून दिलासा पण… परमबीर सिंह यांच्या अडचणीत पुन्हा नव्यानं भर जितीन प्रसाद यांना भाजपमध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे. आता उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांवर प्रसाद यांचा इतका प्रभाव असता तर ही मते ते काँग्रेसकडे का वळवू शकले नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवरही टीका केली आहे. जाणून घेऊया काय आहे आजच्या शिवसेनेच्या अग्रलेखात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या