JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'रवी राणा घरी माझे पती, त्यांचा विषय माझा नाही' नवनीत राणांची 'कडू' प्रतिक्रिया

'रवी राणा घरी माझे पती, त्यांचा विषय माझा नाही' नवनीत राणांची 'कडू' प्रतिक्रिया

’ मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. तो माझा विषय नाही. मी माझ्या कामावर लक्ष देत असते. माझे काम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे'

जाहिरात

' मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. तो माझा विषय नाही. मी माझ्या कामावर लक्ष देत असते. माझे काम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 नोव्हेंबर : आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध पेटले आहे. रवी राणा यांच्यासोबत प्रत्येक वादात सोबत राहणाऱ्या त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. ‘रवी राणा हे घरी माझे पती आहे, बाहेर मी लोकांची सेवक आहे, हा विषय माझा नाही’ अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली. रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांना घरात घुसून मारण्याची थेट धमकी दिली आहे. या वादानंतर रवी राणा हे मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी निघाले आहे. तर नवनीत राणा सुद्धा मुंबईकडे निघाल्यात यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राणांनी बोलण्याचं टाळलं. (‘माझ्या शरीराचा कुठला तुकडा….?’,बच्चू कडूंचं रवी राणांना सडेतोड प्रत्युत्तर) ‘मुंबईला माझं घर आहे. मी माझ्या घरी चालली आहे. मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. तो माझा विषय नाही. मी माझ्या कामावर लक्ष देत असते. माझे काम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तो विषय माझा नाही’ असं नवनीत राणा म्हणाल्या. ‘रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे हे आमचे नेते आहे. ते जसं सांगतात तसं आम्ही करतो. त्यांच्यातील वादाचा माझा विषय नाही. रवी राणा यांची पत्नी मी घरी आहे. बाहेर मी लोकांची सेवक आहे’ असं म्हणत नवनीत राणांनी बोलण्याचं टाळलं. ‘दोन लोकप्रतिनिधींच्या या वादावर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं, असं विचारलं असता नवनीत राणा म्हणाल्या की, ‘माझ्यापेक्षा दोन्ही आमदार वरिष्ठ आहे. त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं’ असंही त्या म्हणाल्या. तुम्ही तलवार घेऊन या, मी फूल देईन - बच्चू कडू दरम्यान, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप केला आणि यातून आरोप प्रत्यारोप सुरू झाला, या वादा वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर समेट घडवून आणला होता. आता परत हा वाद आणखी उफाळून आला आहे. (राणा-कडू वाद आणखी पेटणार? रवी राणांच्या इशाऱ्यानंतर बच्चू कडूंचा फडणवीसांना फोन) २ नोव्हेंबर रोजी पुन्हा आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांना घरात घुसून मारू अशी धमकी दिल्याने हा वाद पुन्हा उफाळून आलेला आहे. मात्र या वादावर सावध भूमिका घेत आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांनी आपल्याला ‘तलवार घेऊन मारायला यावं आपण फुल घेऊन तयार आहोत’ असं प्रतिउत्तर दिलं. तसंच आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहायला सांगून आपल्यासाठी हा विषय मिटला असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितलं. आमदार बच्चू कडू आमदार रवी राणा यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर जिल्ह्यातील नागरिकांचा मात्र नाराजीचा सुर आहे,जिल्ह्यात विमानतळ,बेरोजगारी,शेतकरी यांचे अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे दुर्लक्ष करून एकमेकांचे वाभाडे काढणे बंद करून जिल्ह्याच्या विकासांकडे लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य नागरिकांची आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या