उस्मानाबाद, 9 जूलै : जिल्ह्यातील येडशी गावात बालाघाटात (Balaghat) निसर्गरम्य पर्यावरणात वसलेले रामलिंग मंदिर आहे. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे या स्थानाला मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. जसा पावसाळा सुरू होतो तसे अनेक पर्यटक (Tourist places in Marathwada) या ठिकाणी भेट देतात. पावसाळ्यात पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला असतो. रामलिंग मंदिराच्या (Ramling Temple) भोवती वळसा घालून जाणाऱ्या नदीमुळे हे पर्यटन स्थळ आणखीनच मनमोहक बनते. रामलिंग मंदिराचा परिसर हा पूर्ण हिरवागार आणि जैवविविधतेने संपन्न आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी शासनाने 1997 मध्ये 2237.46 हे आर क्षेत्राला रामलिंग घाट अभयारण्य म्हणून घोषित केले. हे स्थळ जिल्ह्यातील पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे स्थळ आहे. रामलिंग मंदिराच्या बाजूने उंचावरुन कोसळणारा धबधबा हा सतत वाहत राहावा यासाठी मंदिराला वेडा टाकणाऱ्या नदीवर जागोजागी प्रशासनांकडून बंधारे घालण्यात आलेले आहेत. बंधाऱ्यामुळे रामलिंगचा धबधबा हा बारा महिन्यांपैकी आठ ते नऊ महिने संत गतीने वाहतो. रामलिंग नाव कसे पडले? रामलिंग हे नाव या ठिकाणाला कसे पडले याचा उल्लेख रामायणाशी आहे. प्रभू रामचंद्राच्या नावावरून या ठिकाणाला रामलिंग मंदिर हे नाव पडले. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षांच्या वनवासाचा प्रवास करत होते तेव्हा रावणाने सीतामाताचे अपहरण करून त्यांना आपल्या सोबत बालाघाटाच्या याच मार्गाने लंकेच्या दिशेने घेऊन जात होता. तेव्हा जटायू पक्षाने रावणाचा मार्ग याच ठिकाणी अडवला. परंतु रावणाच्या शक्ती पुढे जटायू पक्षाची शक्ती कमी पडली आणि जटायू पक्षी घायाळ झाला. घायाळ जटायूला तिथेच सोडून रावण मात्र सीता मातेला सोबत घेऊन लंकेच्या दिशेने पुढे गेला. नंतर सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र लक्ष्मणासोबत याच ठिकाणी पोहोचले तर त्यांना जटायु पक्षी जखमी अवस्थेत आढळून आले. वाचा-
Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO
रामाने बाण मारून पाणी काढलं जटायू पक्षाने जखमी अवस्थेत प्रभू रामचंद्राला रावणाचा मार्ग व घडलेल्या प्रसंग सांगितला, तेव्हा प्रभू रामचंद्राने एका जागेवर बाण मारून पाणी काढलं आणि जटायूला पाणी पाजले होते. आज त्याच ठिकाणाला रामबाण म्हणून ओळखले जाते. आजही पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रताप उसळत असतो. येथे असलेले महादेवाच्या मंदिराला रामाने भेट दिल्यामुळे या ठिकाणाला राम मंदिर असे नाव पडले. इकडून तिकडून उड्या मारणारी माकडं उस्मानाबाद जिल्हा अवर्षण क्षेत्रात येतो. असे असले तरी पर्जन्य राजाची कृपा झाली की हा परिसर अवर्षणाची कात टाकतो. आणि हिरवाईची चादर ओढाळून झाडांच्या असंख्य निर्झर खळखळत राहतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते आणि डोंगराच्या अंगा खांद्यावर झाडीमध्ये इकडून तिकडून उड्या मारणारी माकडे असे सुंदर वातावरण अनुभवल्यावर येथे येणारा प्रत्येक पर्यटक हा आनंदी होतो. रामलिंग या धार्मिक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात, रामलिंग मंदिर पाहण्याचा उत्तम कालावधी जून ते ऑक्टोबर या महिन्यात असतो. येडशी पासून तीन किलोमीटर अंतरावर व पांगरी, तालुका बार्शी पासून 10 किलोमीटर अंतरावर रामलिंक मंदिर आहे.
गुगल मॅपवरुन साभार वाचा-
Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO
“इथे आल्यानंतर रामायण डोळ्यासमोर घडते असे वाटते.” उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजाभवानी नंतर रामलिंग या ठिकाणी यावसं वाटतं. इथे आल्यानंतर मन प्रसन्न होतं. रामायण डोळ्यासमोर घडले असे वाटते, मनाला शांती मिळते. इथली हिरवळ आणि पाणी पाहून घराकडे पाय निघतच नाहीत. इथला धबधबा आम्हाला मनमोहक करून टाकतो अशी प्रतिक्रिया पर्यटक अतिश तुपारे यांनी दिली.