JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेंच्या जुन्या व्यंगचित्राची सोशल मीडियावर का होतं आहे चर्चा?

राज ठाकरेंच्या जुन्या व्यंगचित्राची सोशल मीडियावर का होतं आहे चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचे दिलेले संकेत हे व्यंग चित्र पुन्हा व्हायरल होण्याचं कारण आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जुनं व्यंगचित्र सोशल मीडियावर पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचं निमित्त आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया बंद करण्याचे ट्विटरवरून दिलेले संकेत आहेत. त्यानंतर हे व्यंग चित्र पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत आहे. हे व्यंगचित्र 9 ऑक्टोबर 2017 रोजी रेखाटण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. भाजपचं सर्वात मोठं अस्त्र म्हणून ओळखलं जाणारं सोशल मीडियाचं हे अस्त्र बुमरँग सारखं त्यांच्यावरच पुन्हा उलटून येत असल्याच्या आशयाचं हे चित्र राज ठाकरे यांनी रेखाटलं होतं. फेसबुक, ट्विटरवर हे चित्र पुन्हा व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र याच सोशल मीडियासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘या रविवारी मी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यावरील माझी खाती सोडण्याचा विचार करत आहे,’ असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींनी असं अचानक सोशल मीडिया सोडण्याचा विचार व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हे वाचा- 22 वर्षे देशासाठी कातडं झिजवलं पण दिल्ली हिंसाचारानं क्षणात रस्त्यावर आणलं पंतप्रधान मोदींनी असं ट्वीट करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांना टोला लगावला आहे. ‘सोशल मीडिया नाही…द्वेष सोडा,’ असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

राहुल गांधीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटवरवर 12.1 मिलियन फॉलोअर्स तर फेसबुकवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. फोटोसाठी लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवरही राहुल गांधींचे अकाउंट आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 9 लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर राहुल गांधींच्या नावाने चॅनेल आहे. या चॅनेलचेही 1 लाख 68 हजार सबस्क्रायबर्स आहेत. हे वाचा- राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या बँकेतील सचिवाचा अपघातादरम्यान मृत्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या