JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अंधाऱ्या खोलीत खांद्यावरील तो हात कुणाचा? राज ठाकरेंनी सांगितला शिवनेरीवरील अंगावर काटा आणणारा अनुभव

अंधाऱ्या खोलीत खांद्यावरील तो हात कुणाचा? राज ठाकरेंनी सांगितला शिवनेरीवरील अंगावर काटा आणणारा अनुभव

शिवनेरीवरील अंगावर काटा आणणारा राज ठाकरेंचा अनुभव…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित  ‘हर हर महादेव’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. एकच चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्यसाधारण व्यक्तिमत्व असणारे बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रीत करण्यात आलेला ‘हर हर महादेव’ हा सिनेमा येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. यावेळी राज ठाकरेंनी अत्यंत दिलखुलासपणे आपल्या चित्रपट प्रेमाविषयी उत्तरं दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आवाज दिला आहे. यानिमित्ताने या महामुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मुलाखतीत राज ठाकरेंनी चित्रपटाविषयी असलेली आपली पॅशन व्यक्त केली. आपल्या आयुष्याचं आणि चित्रपटाचं नातं त्यांनी यावेळी विशद केलं. गांधी हा चित्रपट त्यांना भारावून टाकणारा होता. तब्बल 32 वेळी त्यांनी हा चित्रपट पाहिल्याची कबुली दिली. Raj thackeray : दोन ते तीन भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आणणार; राज ठाकरेंची मोठी घोषणा यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांवरील प्रेमाविषयीचा किस्सा सांगितला. ही गोष्ट 1994 सालची आहे. शिवनेरी सर करून ते किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असं काही घडलं की तो प्रसंग सांगताना त्यांना शहारून आलं. शिवनेरीवर उभे असताना एक हात त्यांच्या खांद्यावर आला, इथच महाराजांनी जन्म घेतला हा आवाज आला. राज यांनी मागे वळून पाहिलं तर दूरदूरपर्यंत कोणीच नव्हतं. त्यांनंतर मी अक्षरश: चोक झाल्याचं राज म्हणाले. यानंतर मी एका ठिकाणी बसलो, दोन तीन बाटल्या पाणी डोक्यावर ओतलं. तो हात कुणाचा होता, हे आजतागायत मला कळालं नाही. त्यानंतर अनेकदा मी शिवनेरीवर गेले, परंतू तसा अनुभव पुन्हा कधीच आला नसल्याचं राज यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचा भव्य चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. दोन ते तीन पार्टमध्ये हा चित्रपट असणार असल्याचंही ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या