JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आपलं वय काय, बोलताय काय? पदाचा मान राखतोय, अन्यथा शिव्या खूप आहेत; राज ठाकरेंचा कोश्यारींवर निशाणा

आपलं वय काय, बोलताय काय? पदाचा मान राखतोय, अन्यथा शिव्या खूप आहेत; राज ठाकरेंचा कोश्यारींवर निशाणा

आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा पार पडली. या सभेमधून त्यांची चौफेर टोलेबाजी केली. त्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27  नोव्हेंबर:  आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा पार पडली.  या सभेमधून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे. मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर निशाणा साधणाऱ्यांना त्यांनी यावेळी चांगलेच फैलावर घेतले. यासोबतच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. कोश्यारीचं वय काय? ते बोलतायेत काय? राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतो.  नाहीतर महाराष्ट्रात शिव्याची कमी नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघात केला. आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न  दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर टीका करणाऱ्यांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. आंदोलन करूनही प्रश्न मनसेलाच विचारले जातात. भूमिका न घेणाऱ्यांना प्रश्न का विचारले जात नाहीत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता मनसेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची पुस्तीकाच काढणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

65 ते 67 टक्के टोल नाके बंद झाले  आमच्या आंदोलनामुळे राज्यातील 65 ते 67 टक्के टोल नाके बंद झाले. मनसेने मराठी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी आंदोलन केलं. मनसेच्या आंदोलनामुळे पाकिस्तानी कलाकारांची हकालपट्टी झाली. मनसेच्या आंदोलनामुळे मशिदीवरील भोंगे उतरले असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. नेहरुंवर टीका करणाऱ्यांना फटकारले  दरम्यान यावेळी नेहरुंवर टीका करणाऱ्यांना देखील त्यांनी फटकारलं आहे. जाणून बूजून  नेहरुंच्या गालाचा मुका घेणाऱ्या तरुणीचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. त्या फोटोवरून नेहरुंना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी नेहरू यांच्या घराण्यातील होती. ती पंडित नेहरू यांची नात होती असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या