मुंबई, 27 ऑगस्ट : - राज्यातील अतिवृष्टीबाधितांना 2019च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. नुकसानग्रस्तांना जुन्या दरापेक्षा वाढीव नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अनेक दिवस होत होती. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे. राज्याच्या अनेक भागात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. कमी वेळात प्रचंड पाऊस (Flash flood), ढगफुटी (cloudburst) या सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अवघी जमीन वाहून गेली. पिकांचं तर अतोनात नुकसान झालं. राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री- फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. पण ठाकरे सरकारच्या म्हणण्यानुसार अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. 2015 च्या दराने अतिवृष्टीग्रस्तांना दिलेली मदत अत्यंत तोकडी पडणारी असल्याने राज्य सरकारने वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचा शिवसेनाला बोचरा सवाल, विचारलं की… राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम 2019 च्या महापुरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.