रायगड, 6 सप्टेंबर : आपल्याकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक जण रेल्वेने तिकिट आरक्षित आरक्षित करुन प्रवास करणे प्रसंद करतात. तर काही जण विनातिकिटही प्रवास करत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आरक्षित तिकीट केलेल्या प्रवाशांची रेल्वे सुटली तर काय होईल तुम्ही विचार केला आहे का? तर आता माणगावमध्ये प्रवाशांनी चक्क रेल्वे रोखल्याचे प्रकार समोर आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - माणगाव परिसरातुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी वापी ट्रेनचे तिकीट आरक्षित केले होते. ही रेल्वे संध्याकाळी 4 वाजता माणगाव स्थानकामध्ये आली. मात्र, आतील प्रवाशांनी रेल्वेची दारे बंद केल्याने माणगाव स्थानकामध्ये प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेत चढता आले नाही. परिणामी रेल्वे निघून गेली. यानंतर प्रवाशी अत्यंत संतप्त झाले होते. ही रेल्वे निघून गेल्याने या संतप्त प्रवाशांनी मागून येणाऱ्या जबलपुर एक्सप्रेसचा रस्ता अडवला. यादरम्यान माणगाव स्थानकामध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण परिस्थितीदरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र, यादरम्यान सुमारे तासभर माणगाव रेल्वे स्थानकात प्रचंड गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. हेही वाचा - Cyrus Mistry : सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर सरकारचं मोठं पाऊल; सीटबेल्टसंबंधी नियमांत होणार बदल कल्याण रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला - कल्याण जवळ रेल्वे स्थानकात एका रेल्वे ट्रॅकला तडे पडल्याचे निदर्शनास आल्याने मोठा रेल्वे अपघात टळला आहे. लाईनमनने हे सुरुवातीला पाहिलं आणि यानंतर त्याच्या प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील पत्रिपुलाजवळ सकाळी साडे सहा ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅक फ्रॅक्चर झाला होता. लाईनमनला ही बाब समजल्यावर त्याने लगेचच याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. दरम्यान, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेतली. तसेच यानंतर रेल्वे प्रशासनाने या ट्रॅकवरुन जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तत्काळ थांबवली. त्यामुळे मोठा रेल्वे अपघात टळला.