JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मनाची तयारी आहे का'? राहुल गांधींचा नाना पटोलेंना फोन, काय चर्चा झाली?

'मनाची तयारी आहे का'? राहुल गांधींचा नाना पटोलेंना फोन, काय चर्चा झाली?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाना पटोले यांना स्वतः फोन करून याबाबत चर्चा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मनाची तयारी आहेत काय? अशी विचारणा राहुल गांधींनी नाना पटोले यांना केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 02 सप्टेंबर : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावावर जोरदार चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत होती. यादरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. राहुल गांधी यांनी नाना पटोले यांना स्वतः फोन करून याबाबत चर्चा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मनाची तयारी आहेत काय? अशी विचारणा राहुल गांधींनी नाना पटोले यांना केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी तयारी केली आहे का? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील तीन नेत्यांच्या नावावर चर्चा केली होती. यामध्ये सुशील कुमार शिंदे, मुकूल वासनिक आणि नाना पटोले यांची नावं होती. मात्र, राहुल गांधीच अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा नाना पटोले यांनी नुकतीच व्यक्त केली होती. मोठी बातमी! काँग्रेसला पुन्हा झटका, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे माजी मंत्री घेणार शपथ? राहुल गांधी यांचा नाना पटोले यांनाच फोन का? - नाना पटोले राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत. - नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक आहेत. - भाजपचा कट्टर विरोधक म्हणून नाना पटोले यांची काँग्रेस पक्षात ओळख आहे. - ओबीसी नेते म्हणून पटोले यांची ओळख. - नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजपच्या खासदारकिचा राजीनामा दिला होता. - कार्यकाळ शिल्लक असताना नाना पटोले यांनी खासदारकीचा राजिनामा दिला होता. - पाऊणे दोन वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना दिलेला राजीनामा. नाना पटोलेंनी दिलेली प्रतिक्रिया - काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडसाठी माझ्या नावाची चर्चा झाली आहे, ह्या फक्त अफवा आहेत. राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावं असं आमची इच्छा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार राहुल गांधी यांनींच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावं अशी 99 टक्के कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या