चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 12 जुलै : लोणावळा येथील भुशी धरणात (Bhushi dam) तरुण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हाय टेन्शन वायरला पाय लागल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू (Young Boy Death Pune) झाला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - पुण्यात एका 20 वर्षांच्या तरुणाचा हाय टेन्शन वायरला पाय लागला. मात्र, यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दत्तवाडी या भागात ही घटना घडली. रोहित थोरात, असे मृत तरुणाचे नाव आहे. रोहित हा स्वतः भाजी विक्रेता आहे. सकाळी दूध आणायला गेला असता रोहितचा पाय रस्त्यावर पडलेल्या हाय टेन्शन वायरला लागला आणि तो जागीच मृत्यू पावला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. हेही वाचा - Video : पर्यटन आलं अंगाशी, लोणावळ्यातील भुशी धरणात तरुण बुडाला पुण्यात भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्या - आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने (Daughter In Law) आत्महत्या (suicide) केली आहे. सुनेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आळंदी (suicide in alandi) नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे (Alandi Nagar Parishad), त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. (bjp) दरम्यान तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. हुंड्यात ठरलेल्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेत गळफास घेऊन मयत झालेल्या तरुणीचं नाव प्रियंका घोलप, प्रियांका ह्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगर सेविका कमल घोलप यांची मुलगी आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.