पुणे, 25 नोव्हेंबर : लग्नसराईचा मोसम आता सुरू झाला आहे. लग्नामध्ये शॉपिंगसोबतच महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे मेंदी. लग्नाच्या खास दिवशी आपण सुंदर दिसावं, छान कपडे, दागिने घालावे अशी प्रत्येक नवरा-नवरीची इच्छा असते. नवरा-नवरीच्या या गोष्टीकडं सर्वांचं लक्ष असतं. त्याचबरोबर विशेषत: नवरीच्या हातावरील मेंदी हा देखील सर्वांच्या आकर्षणाचा विषय असते. ही मेंदी अगदी सोप्या पद्धतीनं कशी काढावी यासाठी पुण्यातील अनमोल मेंहदीवाले यांनी खास टिप्स सांगितल्या आहेत. मेंदी काढण्याच्या टिप्स ‘कोणतीही मेंदी काढताना ती जास्त स्क्रीन टच नसावी. मेंदी ही हलक्या हाताने वरच्यावर कोनाने सोडता यावी. मेंदी काढण्यासाठी कोन देखील उत्तम प्रतीचा घ्यावा. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असलेला मेंदी कोन वापरु नये. बंपटी, झिगझॅक या लाईनमुळे मेंदी भरण्यास मदत होते ती नेहमी हलक्या हाताचा वापर करावा,’ असे अनमोल यांनी सांगितले. अनमोल पुढे म्हणाले की, ‘सध्या मेंदीमध्ये अरेबिक डिझाईन, मीनाकाम डिझाईन, दुबई पॅटर्न, पारंपरिक भारतीय डिझाईन, लोटस डिझाईन, शेड्स रोझ डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामध्ये विविध आकारांचा समावेश होतो. हे आकार काढताना स्केचिंग लाईन हा पर्याय वापरावा. कधी मेंदी काढताना डायरेक्ट डिझाईन काढण्यापेक्षा त्याचा आराखडा स्केचिंग लाईनद्वारे हातावरती काढून उर्वरित मेंदी भरून घ्यावी. करा हो लगीनघाई! 2023 सालातील लग्नाचे सर्व शुभ मुहूर्त एका क्लिकवर मेंदीमध्ये जास्त करून फुलांच्या, पानांच्या डिझाईन काढाव्यात. त्याला सपोर्टिंग म्हणून झिगझ्याक डिझाईन बंपटी लाईन्स चेक्सचे विविध प्रकार मोरांचे विविध प्रकार कलश डिझाईनद्वारे मेहंदी पूर्णपणे भरून घ्यावी. फुलांमध्ये देखील अनेक प्रकार काढता येतात चेक्समध्ये देखील विविध प्रकार आपल्याला वापरता येतात. मेंदी काढणं ही तर एक कला आहे यासाठी तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागते. कोणती मेहंदी पूर्ण शिकण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागतो.’ मेंदी कशी शिकणार? मेंदी शिकण्याची सुरुवात ही पहिल्यांदा पेपरवर करावी, असे अनमोल यांनी स्पष्ट केले. पेपरवर मेंदी शिकल्यामुळे तुम्हाला मेंदीची डिझाईन कशी काढायची याबद्दलचा अंदाज येईल. हातावर मेंदी काढणे यामुळे सोपे होते, तसंच वेगवेगळ्या आकारांचीही माहिती होते. पेपरवर मेंदीची प्रॅक्टिस केल्यामुळे मेंदीची नक्षी कशी असावी याबद्दलचा अंदाज येतो. …नाटकं सांगायची न्हाईत! अस्सल कोल्हापुरी भाषेतील लग्न पत्रिका व्हायरल, पाहा Video मेंदी काढताना स्केच डिझाईनमध्ये नक्षी भरल्यावर दोन फिनिशिंग लाईनची गरज असते. यामध्ये साधी फिनिशिंग लाईन आणि सुपर फिनिशिंग लाईन याद्वारे तुमची मेंदी ठळक आणि उठावदार होते. त्यामुळे मेंदीमध्ये काढलेल्या नक्षीला आणखी चांगला रंग येतो.