JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिवाळीच्या तोंडावर पुण्यात दुर्दैवी घटना, हॉटेलच्या आगीत 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

दिवाळीच्या तोंडावर पुण्यात दुर्दैवी घटना, हॉटेलच्या आगीत 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

आज सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमध्ये आग लागली होती.

जाहिरात

आज सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमध्ये आग लागली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 ऑक्टोबर : ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. शहारातील सदाशिव पेठमध्ये एका हॉटेलमध्ये आग लागली. या दुर्घटनेमध्ये एका 10 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमध्ये आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अग्निशमन दलाचे 3 वाहने दाखल झाली. हॉटेलमधून 3 सिलेंडर बाहेर काढण्यात आले. या आगीमध्ये एक 10 वर्षांची मुलगी अडकली होती. (पुणे मनपा हद्दीत 23 गावं समाविष्ट करण्यावरुन नवा ट्विस्ट; माजी आमदार शिवतारेंच्या यू टर्नमुळे राष्ट्रवादीचा संताप) या मुलीला जवानांनी बाहेर काढले असून जखमी अवस्थेत अग्निशमन दलाच्या वाहनातून जवळच्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारदरम्यान या चिमुरडीचा मृत्यू झाला. दुकानाला आग कशामुळे आणि का लागली याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. मात्र, या चिमुरडीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. परळीत स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीला आग, महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक दरम्यान, बीडच्या परळी शहरातील स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रच्या मोंभागातील शाखेला आज सकाळी आग लागली होती. या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. सुट्टीच्या दिवशी आग लागल्याने मोठा अनर्थ टळला. या भीषण आगीत बँकेतील साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (‘पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय’, शिवसेनेनं उडवली भाजपची खिल्ली) आग आटोक्यात आणण्यासाठी परळी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये बँकेतील काही रेकॉर्ड फाईल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग कशाने लागली याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र बँकेतील काही कागदपत्र तसेच वस्तूंचं नुकसान आगीत झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या