मुंबई, 13 ऑगस्ट : खो-खो लीगच्या पहिल्या सिझनला (Ultimate Kho Kho League 2022) रविवारपासून पुण्यात सुरूवात होत आहे. या सिझनमध्ये 6 टीम सहभागी होणार असून 34 सामन्यांनतर पहिला विजेता निश्चित होईल. चेन्नई क्विक गन्स (Chennai Quick Guns), गुजरात जायंट्स (Gujarat Giants), ओडिशा जगरनॉट्स (Odisha Juggernauts), राजस्थान वॉरियर्स (Rajasthan Warriors), तेलुगु योद्धाज (Telugu Yoddhas) या पाच टीमसह मुंबई खिलाडीज (Mumbai Khiladis) ही टीम सहभागी होणार आहे. खो-खो लीगमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबईच्या टीमकडे सर्वांचं लक्ष आहे. पुण्यातील बालेवाडीत होणाऱ्या या स्पर्धेत ही टीम विजेतेपदाची मुख्य दावेदार मानली जात आहे. मुंबईच्या या टीममध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश असून दोन मराठी खेळाडू या टीमचे ट्रम्प कार्ड आहेत. कार्पेंटरचा मुलगा दुर्गेश मुंबई खिलाडीजचं पहिलं ट्रम्प कार्ड आहे दुर्वेश साळुंखे (Durvesh Salunke). मुंबईकर दुर्वेशनं खो-खो खेळण्यास उशीरा सुरूवात केली. पण, त्यानं नियमित खेळ सुरू केल्यानंतर मागं वळून पाहिलं नाही. दुर्वेशचे वडिल कार्पेंटर आहेत. त्याला सुरूवातीला घरच्यांकडून पाठिंबा मिळाला नाही. त्यातच उशीरा खेळ सुरू केल्यानं किती यश मिळेल याबाबत घरच्यांना शंका होती. पण, दुर्वेशच्या खेळातील प्रगती पाहून त्यांचं मत बदललं. दुर्वेशनं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर खेळावर फोकस करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानं क्रीडा शिक्षक होण्याचं ठरवलं. आता शाळेमध्ये मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण करण्याबरोबरच स्वत:ही खेळामध्ये करिअर करत आहे. ‘आजवर खेळामध्ये मी जे काही शिकलोय ते सर्व मुलांना देण्याचा प्रयत्न करेन,’ असे दुर्वेशने यावेळी सांगितले. Ultimate Kho Kho : लॉन्ड्रीचालकाचा मुलगा बनला मुंबईचा आधार गजानन करणार आईचं स्वप्न पूर्ण मुंबई खिलाडीजचा व्हाईस कॅप्टन गजानन शेंगाळे (Gajanan Shengale) त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या लीगमध्ये उतरलाय. गजाननला अगदी लहान वयात वडिलांच्या वियोगाचा धक्का सहन करावा लागाला. त्यानंतर आईनंच त्याला घडवलं. ‘माझ्या आजवरच्या खेळातील यशामध्ये आईचा मोठा वाटा आहे. आईनं माझा खेळ फार पाहिला नाही, पण आपला मुलगा उत्तम खेळतो, याची तिला खात्री आहे,’ अशी भावना गजानननं व्यक्त केली. गरिबीला ‘खो’ देऊन बनला मुंबईचा कॅप्टन, पानटपरी चालकाच्या मुलाचं नशीबच बदललं! VIDEO मुंबईच्या टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून एक अतिरिक्त जबाबदारी गजाननवर आहे. या नव्या जबाबदारीची त्याला जाणीव आहे. ‘आमची टीम डिफेन्स आणि अटॅक या दोन्ही बाबतीतमध्ये स्ट्राँग आहे. त्यामुळे आम्ही मॅचमध्ये अवघड परिस्थितीतही विजय खेचून आणू शकतो,’ असा विश्वास गजाननं व्यक्त केला आहे.