JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : कसा असतो पारशी नववर्ष दिन? जाणून घ्या अनेक शतकांची परंपरा, VIDEO

Pune : कसा असतो पारशी नववर्ष दिन? जाणून घ्या अनेक शतकांची परंपरा, VIDEO

पारशी समाजात प्रेम बंधुता यासाठी पतेती Pateti 2022 हा सण ओळखला जातो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 ऑगस्ट : पतेती (Pateti 2022) हा सण पारशी ( parshi ) बांधव खूप उत्साहाने साजरा करतात. हा सण म्हणजे पारश्यांचा नववर्ष आहे. ज्या प्रकारे हिंदू,मुस्लिम बांधव आपले सण उत्साहाने साजरे करतात, त्याच प्रमाणे पतेती हा पारशी बांधवांचा सण आहे. या दिवशी पारशी बांधव अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. चला तर मग काय आहे पतेती या सणाचा इतिहास आणि परंपरेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. पारशी समाजात प्रेम बंधुता यासाठी पतेती हा सण ओळखला जातो. यंदा पतेती सण सोमवारी म्हणजेच आज साजरा होत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी पारशी नववर्ष सुरू होणार आहे. पारशी समाजाच्या पारंपरिक दिनदर्शिकेनुसार ‘पतेती’ हा वर्षातील शेवटचा दिवस असतो. पतेतीला पारशी लोक अग्नीची पूजा करतात त्याला अहुरा माजदा म्हटले जाते.  पारशी लोकांच्यामध्ये वर्षाच्या शेवटचे दहा दिवस हे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी असतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवीन वर्षी तुम्ही तुमच्या नवीन वर्षाच्या संकल्पना सह सुरू करू शकता. त्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

हेही वाचा :  Kho Kho League : 2 मराठी खेळाडू ठरणार मुंबईचे ट्रम्प कार्ड, परिस्थितीशी झगडत मिळवलंय यश, VIDEO

पतेती उत्सवाची सुरुवात कशी झाली?  पारशी समाजाच्या मान्यतांनुसार तीन हजार वर्षांपूर्वी राजा साह जमशेद इराणच्या सिंहासनावर विराजमान झाला होता. पारसी समाजातील लोकांनी आनंदाने त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. राजा जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती उत्सव साजरा करू पारशी लोग साजरा करू लागले. पतेती सण असा साजरा केला जातो? पारशी समाज हा अग्निपूजक आहे यासाठीच समाजाचे मंदिर म्हणजे अग्यारी येथे अग्नीची पूजा केली जाते. पारशी नव वर्ष हे ऑगस्टमध्ये सुरू होते. यामध्ये आधीच्या वर्षाच्या शेवटचे दहा दिवस हे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आपल्या झालेल्या चुकांची माफी मागण्यासाठी पारशी लोकांच्या मध्ये महत्त्वाचे मानले जातात. यामध्ये त्यातील दहाव्या शेवटच्या दिवशी अनेक पारशी नागरिक आपल्या जवळील अग्यारीला भेट देतात. तिथे आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. हा दिवस पतेती म्हणून ओळखला जातो, असे अग्यारीचे हाय प्रेस्ती कईपेशन यांनी local18 बोलताना सांगितले.  

Ultimate Kho Kho : लॉन्ड्रीचालकाचा मुलगा बनला मुंबईचा आधार, खो-खो लीगमध्ये घेणार भरारी, VIDEO

संबंधित बातम्या

दुसरा दिवस म्हणजे पारसी नव वर्ष होय या दिवशी सर्व लोक एकमेकांना भेटतात आणि आनंदाने हा दिवस साजरा करतात. यावेळी वेगळे वेगळे नाटक, खेळ विविध आनंदोत्सव या दिवशी साजरे केले जातात.तसेच पारशी लोकांचे पारंपारिक पदार्थ एकमेकांना देऊन या दिवशी आनंद व्यक्त केला जातो. येथे अग्यारीमध्ये यज्ञ असतो त्या यज्ञाची पूजा केली जाते. हा यज्ञ 24 तास सुरू ठेवण्याची जबाबदारी येथील अग्यारीचे पुजारी म्हणजे प्रेस्ती यांची असते. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या