गणेश दुडम,मावळ 25 सप्टेंबर : मावळातील विसापूर किल्ल्यावर मुंबई, पुणेसह राज्यभरातील शेकडो पर्यटक दाखल होत असतात. मात्र, अनेकदा याठिकाणी दुर्घटनाही घडत असतात त्यामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी आल्यावर काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं. विसापूर किल्ल्यावरुन सध्या याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. ज्यात एका वाटसरूचा तोल जाऊन तो खोल दरीत पडला.
VIDEO : पुण्यातली अतिशय वेदनादायी घटना, आईने पोटच्या लेकराला ट्र्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली जाताना पाहिलं या वाटसरूचं दैव बलवत्तर होतं असंच म्हणावं लागेल. कारण मावळातील विसापूर किल्ल्यावर तोल जाऊन तो खोल दरीत पडला मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला. वाटसरू दरीत पडल्याची माहिती मिळताच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम याठिकाणी पोहोचली. यानंतर या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बराच वेळ प्रयत्न केले गेले.
शिवदुर्ग रेस्क्यू पथकाच्या अथक परिश्रमांना अखेर यश आलं आणि त्या जखमी वाटसरूला किल्ल्यावरून खाली सुरक्षित आणण्यात आलं. त्याचं दैव बलवत्तर होतं म्हणून फक्त त्याच्या पायाला दुखापत झाली. या घटनेत वाटसरूला गंभीर दुखापत झाली नसली तरी यात त्याच्या पायाचं हाड मोडलं आहे. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. Pune : गणपती गावाला गेले तरी पालिकेला निर्माल्य उचलण्यास वेळ नाही! पाहा Video काही दिवसांपूर्वीच मावळातील विसापूर किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या काही तरुणांना शिवभक्तांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. विसापूर किल्ल्याचं पावित्र्य न राखता तिथं मद्यपान करणाऱ्या तरुणांना शिवभक्तांनी कानशिलात लगावत चोप दिला होता. मद्यपान करणाऱ्या काही जणांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आलेली.